बंदुकीच्या गोळ्यांचा सामना, दहशतवाद्यांचा खात्मा; मुख्यमंत्रिपदाचा असाही चेहरा

Ajay Kothiyal AAP CM Candidate Uttarakhand Assembly Election 2022
Ajay Kothiyal AAP CM Candidate Uttarakhand Assembly Election 2022Google

उत्तराखंड विधासनसभा निवडणुकीत (Uttarakhand Assembly Election 2022) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्ष ही निवडणूक लढवत आहे. याठिकाणी बंडखोरांनी भाजप आणि काँग्रेसचं टेंशन वाढवलं आहे. आम आदमी पक्षाने कर्नल अजय कोठीयाल ((Ajay Kothyal)) यांना मुख्यमंत्रिपदाचा (AAP CM Candidate) चेहरा बनवले आहे. कोठीयाल यांनी त्यांच्या आयुष्यातील २६ वर्ष लष्करात घालवले आहेत. त्यांच्या शौर्याच्या कहाण्या लोकांना प्रेरणा देतात. जाणून घेऊया कोठीयाल हे नेमके कोण होते?

अजय कोठीयाल यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९६९ मध्ये उत्तराखंडमधील टिहरी येथे झाला. डेहराडूनच्या सेंट जोसेफ स्कूलमधून त्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांना लहानपणापासून सैन्याची आवड होती. त्यांचे वडील देखील लष्करात मोठ्या पदावर कार्यरत होते. त्यांनी १९६२ च्या युद्धात भाग घेतला होता. त्यानंतरही ते दीर्घकाळ बीसएसएफमध्ये सेवा करत होते. वडिलांच्या सेवेमुळे अजय यांना लहानपणाची लष्कराचा अनुभव आला. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला.

...अन् केला १७ दहशतवाद्यांचा खात्मा -

अजय कोठियाल १९९२ मध्ये लष्करामध्ये रुजू झाले. ते गढवाल रायफल्य बटालियनमध्ये सेकंट लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी २६ वर्ष विविध क्षेत्रात सेवा केली. त्यांचे पराक्रम आणि शौर्यासाठी त्यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९९९ च्या कारगिल युद्धात देखील त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांची लष्करात कॅप्टन म्हणून नियुक्ती झाली. तसेच त्यांनी २००१ ते २००३ या काळात जम्मू-काश्मीरमध्ये पोस्टींग देण्यात आले. त्यांनी दोन मोठ्या ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता. यामध्ये एकूण २६ दहशतवादी मारले गेले होते. यापैकी १७ दहशतवाद्यांचा खात्मा कोठियाल यांनी केला होता. दहशतवाद्यांच्या गोळ्या देखील त्यांनी खाल्ल्या. पण, ते खचले नाही. त्यांनी देशसेवेसाठी धैर्यानं दहशवात्यांशी दोन हात केले. ऑपरेशन कोंगवतनमुळे देखील कर्नल अजय कोठियाल चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी सात दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर त्यांना मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com