
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालंय.
सत्ता मिळाल्यानंतर समान नागरी कायदा लागू करणार : पुष्कर धामी
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Manipur Assembly Election) भाजपला (BJP) चांगलं यश मिळालंय. पाचपैकी चार राज्यात भाजपला बहुमत मिळालंय. यातील मणिपूरमध्ये (Manipur) भाजपनं सरकार स्थापन केलंय. दरम्यान, आज पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) हे दुसऱ्यांदा उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शपथ घेण्यापूर्वीच पुष्कर सिंह धामी यांनी आश्वासन दिलंय की, मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर, 'समान नागरी कायद्यासह भाजपनं निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करू, असं म्हंटलंय.
हेही वाचा: भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी प्रथमच आमदाराची निवड; गोरेंकडं मोठी जबाबदारी
राज्यात पारदर्शक सरकार चालवणार असून निवडणुकीपूर्वी भाजपनं जी काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली जातील, असंही आश्वासन धामी यांनी दिलंय. समान नागरी कायदा (Uniform Civil Code) देखील यापैकी एक आहे. निवडणुकीपूर्वी धामी यांनी त्यांच्या सभांमध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेखही केला होता. कायदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असून त्यात कायदेतज्ज्ञ, ज्येष्ठ नागरिक आणि विचारवंत यांचा समावेश असेल, असं धामींनी सांगितलं होतं. समान नागरी कायदा म्हणजेच, भारतात राहणार्या प्रत्येक नागरिकासाठी, धर्म किंवा जातीचा विचार न करता समान कायदा असेल. समान नागरी कायद्यात विवाह, घटस्फोट आणि मालमत्तेचं विभाजन याबाबत सर्व धर्मांसाठी समान कायदा लागू असणार आहे, असंही ते म्हणाले होते.
हेही वाचा: उत्तराखंडमधील सस्पेंस संपला; धामी उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
आज पुष्कर सिंह धामींच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील उपस्थित राहणार आहेत. यासोबतच भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही यात सहभागी होणार आहेत. पुष्कर सिंह धामी हे 12 वे मुख्यमंत्री म्हणून दुपारी 2.30 वाजता देहराडूनच्या परेड ग्राउंडवर शपथ घेतील. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
Web Title: Political News Pushkar Singh Dhami Oath Taking As Uttarakhand Cm Pm Modi Uniform Civil Code
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..