सरणाची राख निवली नाही तोच…, वसंत मोरेंचा शिंदे फडणवीसांना गंभीर सवाल: Pune Bypoll Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant More

Pune Bypoll Election: सरणाची राख निवली नाही तोच…वसंत मोरेंचा शिंदे फडणवीसांना गंभीर सवाल

कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, मनसे नेते वसंत मोरे यांनी शिंदे फडणवसी सरकारला गंभीर सवाल उपस्थित केला आहे. (Pune Bypoll Election facebook Post Eknath Shinde Devendra Fadnavis )

भाजपच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं कर्करोगानं निधन झाल्यानं दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या.

राज ठाकरे या दोन्ही पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यापूर्वीच वसंत मोरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पोटनिवडणुकीवरून सवाल केले आहेत.

'सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या.' असं मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच, विधानसभेची निवडणूक होते, मग महापालिकेची का नाही? असा सवालही मोरे यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे मोरेंची फेसबुक पोस्ट?

माझा शिंदे + फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे,

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे २ आमदार नुकतेच मयत झाले.

आजुन त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल,

तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या,

मग मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही

प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे...

विकास कामे ठप्प झाली आहेत निधी नसल्यामळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही...,

पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार...

राज ठाकरे हे उद्या शनिवारी या दोन्ही निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच मनसे नेते वसंत मोरे यांनी वेगळी भूमिका घेत राज्य सरकारला महापालिका निवडणुकीवरून इशारा दिल्याने राज ठाकरेंची भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Vasant More