पोटनिवडणुकीत भाजपला धक्का; छत्तीसगड-महाराष्ट्रात काँग्रेसची आघाडी

Congress
Congressesakal
Summary

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरूय.

बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि चार विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाची (BJP) निराशा झालीय. बिहारमधील बोचहान जागेवर प्रतिस्पर्धी आरजेडीनं निर्णायक आघाडी घेतलीय. याशिवाय, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात काँग्रेसला (Congress) फायदा होताना दिसतोय. बंगालमध्येही सत्ताधारी टीएमसी (TMC)विजयाकडं वाटचाल करताना दिसत आहे.

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आसनसोलमधून तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) उमेदवार, अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आघाडीवर आहेत. तर, भाजप सोडून तृणमूलमध्ये दाखल झालेले बाबुल सुप्रियो बालीगंज विधानसभा मतदारसंघात पुढं आहेत. बिहारमधील बोचहान जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आरजेडीनं निर्णायक आघाडी घेतलीय. सध्या मतमोजणीच्या नऊ फेऱ्या संपल्या आहेत. RJD 11620 मतांनी आघाडीवर आहे. आरजेडीच्या अमर पासवान यांना 26623, भाजपच्या बेबी कुमारीला 15003 आणि व्हीआयपी उमेदवाराला 13512 मतं मिळाली आहेत.

Congress
सुखविंदर सिंहांनी अयोध्येत लाँच केला 'हनुमान चालिसा' म्युझिक व्हिडिओ

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला फायदा

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) राजनांदगाव जिल्ह्यातील खैरागढ विधानसभा जागेवर काँग्रेसची वाटचाल सुरू असल्याचं दिसत आहे. काँग्रेस उमेदवाराच्या आघाडीनं 5000 मतांचा टप्पा ओलांडलाय. इथं झालेल्या पोटनिवडणुकीत सुमारे 78 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. काँग्रेसनं निवडणूक प्रचारादरम्यान खैरागडला नवा जिल्हा करण्याचं आश्वासन दिलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जनता काँग्रेस छत्तीसगडचे (जोगी) आमदार देवव्रत सिंह यांच्या निधनामुळं पोटनिवडणूक घ्यावी लागली होती.

Congress
माझ्या विजयाचं खरं श्रेय 'या' लोकांना देणार : जयश्री जाधव

महाराष्ट्रातही काँग्रेसची आघाडी कायम

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची (Kolhapur North Assembly Constituency By-election) मतमोजणी सुरूय. कोल्हापुरात 15 उमेदवार रिंगणात होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस घटक पक्ष आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत आहे. इथं सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसनं दिवंगत आमदार यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिलीय. तर, भाजपनं सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com