

Supreme Court
sakal
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असून या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेवरील सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरची टांगती तलवार कायम राहणार आहे. आज होणारी सुनावणी २८ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता ठेवण्यात आली आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.