पंतप्रधानांच्या सभेपूर्वी दोन दहशतवाद्यांना अटक; व्हीआयपी ताफ्यात घातपाताचा कट उधळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधानांच्या सभेपूर्वी दोन दहशतवाद्यांना अटक

पोलिसांनी दोघांनाही अटक करून ठाण्यात आणले असता रात्री तेथे हल्ला केला.

पंतप्रधानांच्या सभेपूर्वी दोन दहशतवाद्यांना अटक

इंफाळ : पाच राज्यात विधानसभा निवडणुकांती रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी या राज्यांमध्ये सभा, रॅली आणि गाठीभेटींवर भर दिला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केले. मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमधील कांगपोकपीजवळच्या परिसरातून आयईडीसह दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

हेही वाचा: UP Election: साखरपट्ट्यात सप - भाजपत कमालीची कटुता..!

मिळालेली माहिती अशी, या दहशतवाद्यांनी मोठा कट रचना आखली असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीसाठी राज्यात व्हीव्हीआयपी मुव्हमेंट सुरू असताना दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली जात असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. इंफाळ ते कांगपोकपी या मार्गावर व्हीव्हीआयपी ताफ्याला स्फोट घडवण्याचा कट रचला जात होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक केलेले दोन्ही दहशतवादी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड नावाच्या फुटीरतावादी संघटनेशी संबंधित आहेत. पोलिस पथक या दोन्ही दहशतवाद्यांची चौकशी करत असून ते कोणाला टार्गेट करणार होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही पोलिसांना सांगितले आहे.

पोलिसांनी दोघांनाही अटक करून ठाण्यात आणले असता रात्री तेथे हल्ला केला. या घटनेनंतर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत हवेत गोळीबार केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे येथील पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, विशेष म्हणजे मणिपूरमध्ये पहिल्या दोन टप्प्यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. मात्र त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत. आता मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 28 फेब्रुवारी आणि 5 मार्चला मतदान होणार आहे.

हेही वाचा: UP Election 2022: काँग्रेसला दलितांचे विस्मरण- मायावती

Web Title: Two Terrorists Caught With Ied Arrested Police After Pm Modi Reach In Manipur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top