उत्तराखंड : पहाडी राज्यात भाजपने इतिहास बदलला; कमळ फुलवणारे ५ फॅक्टर | Uttarakhand Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttarakhand

उत्तराखंड : पहाडी राज्यात भाजपने इतिहास बदलला; कमळ फुलवणारे ५ फॅक्टर

डेहरादून : उत्तराखंडमध्ये पुन्हा (Assembly Election) एकदा भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचे चित्र असून, हाती आलेल्या आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 47, काँग्रेस 19 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहे. निकालाचा कल बदलला तर या विजयासह भाजप (BJP) हा उत्तराखंडवर सलग दोन वेळा सत्तेवर विराजमान करणारा पहिला पक्ष ठरेल. यापूर्वी सलग दोन वेळा येथील जनतेने कोणत्याही पक्षाचे सरकार बनवलेले नाही. राज्यातील भाजपच्या या ऐतिहासिक विजयाची कारणे काय आहेत ते पाहूया. (Uttarakhand BJP Five Factors Of Win)

हेही वाचा: उत्तराखंड : धामी, रावत पराभूत; CM पदासाठी नवा चेहरा कोण?

1) योग्य वेळी मुख्यमंत्री बदल : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राज्याची सत्ता पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याकडे सोपवली. त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) आणि तीरथ सिंह रावत यांच्यानंतर धामी यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले. पुष्कर सिंह धामी हे गेल्या 5 वर्षात भाजपचे तिसरे मुख्यमंत्री होते. गेल्या दोन मुख्यमंत्र्यांच्या खराब कामगिरीची भरपाई करण्यासाठी धामी यांची निवड करण्यात आली होती. मागील दोन मुख्यमंत्र्यांपैकी एकाला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू दिला असता, तर भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकला नसता, असे पक्षाच्या अनेक नेत्यांनी उघडपणे मान्य केले होते.

हेही वाचा: नव्या खेळीत कॅप्टनची 'हिट विकेट', आपच्या कोहलींकडून पराभूत

2 ) मोदी फॅक्टर : भाजपला 2017 प्रमाणे यंदाही राज्यात मोदी (Modi Factor) फॅक्टर काम करेल अशी अपेक्षा होती. 2017 मध्ये उत्तराखंडच्या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाची भूमिका होती आणि यावेळीही तीच राहिली, असा पक्षाचा विश्वास आहे. पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री करून भाजपविरोधात सत्ताविरोधी वातावरण निर्माण झाले होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॅक्टरमुळे ते काही प्रमाणात कमी करण्यात यश आल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

निवडणूक प्रचारात भाजप नेत्यांनी लोकांना मोदींच्या नावाने मतदान करण्यास सांगितले. त्यांच्या सभांमध्ये, निम्म्याहून अधिक भाषणे पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू झालेल्या विकास प्रकल्पांचा संदर्भ देत असत. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष देवेंद्र भसीन म्हणाले की, मोदी हे आमचे सर्वात मोठे आयकॉन आहेत. भाजपसाठी नेहमीच काम करणारा हा घटक आहे. एवढ्या वेळा राज्याला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Election Results : पाच राज्यांचे निकाल : काँग्रेसशिवाय यापुढे देशाचे राजकारण

3) डबल इंजिनचा नारा : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी उत्तराखंडच्या निवडणूक रॅलींमध्ये डबल इंजिन सरकारचा नारा दिला होता. उत्तराखंडच्या विकासासाठी दुहेरी इंजिनचे सरकार असायला हवे, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या अनेक सभांमध्ये सांगितले होते. राज्याचा विकास हा दुहेरी इंजिन सरकारच्या प्राधान्यक्रमात असून यापुढेही असाच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक रॅलींमधली गर्दी पाहून पीएम मोदी म्हणाले होते की, राज्यातील जनतेने त्यांना दुहेरी इंजिनचे सरकार हवे आहे.

4) कमकुवत विरोधक : भाजपच्या विजयाचे प्रमुख कारण म्हणजे विरोधी पक्ष कमकुवत होणे हे देखील आहे. पीएम मोदींचा अनुभव आणि पुष्कर सिंग धामी यांच्या युवा भावनेशी जुळणारा चेहरा काँग्रेसकडे नव्हता हे त्यातील एक कारण आहे. भाजपने पुष्करसिंग धामी यांना समोर ठेवत निवडणूक लढवली, तर काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नावही जाहीर केले नाही. निवडणुकीपूर्वी दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांची नाराजीही चव्हाट्यावर आली होती. निवडणुकीपूर्वीच पक्षांतर्गत लढाई जनतेसमोर आली, त्याचा थेट फायदा भाजपला झाला.

हेही वाचा: 'आम्ही २०२४ ची तयारी केलीय', गोव्यात विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

5) PM मोदींचा अनुभव आणि पुष्कर सिंह धामींचा उत्साह : पंतप्रधान नरेंद्र मोदी दीर्घकाळापासून राजकारणात आहेत. ते 12 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर ते गेल्या 8 वर्षांपासून पंतप्रधानपद भूषवत आहेत. 2017 मध्ये उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला तेव्हाही पंतप्रधान मोदींचा मोठा वाटा होता. भाजपने त्यांच्या अनुभवाचा जोरदार वापर केला. पीएम मोदींच्या अनुभवाशिवाय पुष्कर सिंह धामी यांच्या युवा नेतृत्वाचाही भाजपला फायदा झाला. पुष्कर सिंग धामीचे वय ४६ वर्षे आहे. ते राज्यातील स्टार युवा नेत्यांपैकी एक आहेत.

Web Title: Uttarakhand Assembly Election Result 2022 Reasons Bjp Returning In The Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top