
जनता वसाहतीजवळ कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा; चालक बेपत्ता
पुणे : पर्वती पायथ्यालगत असलेल्या जनता वसाहतीतील कालव्यात रिक्षा कोसळल्याची घटना रविवारी (ता.30) रात्री आठच्या सुमारास घडली. रिक्षा चालक बेपत्ता असून अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. (Pune Auto Rikshaw Canal Water)
अंधारामुळे शोधमाेहिमेत अडथळे आले असून कालव्यालगतच्या रस्त्यावर भरधाव वेगाने निघालेल्या रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा: "राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"
रिक्षा कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रमोद साेनवणे, प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, कोळी, सचिन जवंजाळे, महेंद्र सकपाळ यांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम राबविली. कालव्यालगत बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रखर प्रकाशझोताचा वापर करून जवानांनी रिक्षाचा शोध घेण्यास सुरूवात केली. काही अंतरावर रिक्षा सापडली आहे. मात्र रात्री उशिरापर्यत रिक्षाचालकाचा शोध लागलेला नाही. रिक्षाचालक वाहून गेल्याची शक्यता असून अंधार पडल्याने शोधमोहिमेत अडथळा आल्याचे केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.
Web Title: Rickshaw Accident Canal Water Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..