

Key Development Issues
sakal
विटा : पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या विटा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराने गती घेतली आहे. उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभागनिहाय बैठका, कोपरा सभा, पदयात्रा सुरू आहेत. यामध्ये शहर व उपनगरातील पिण्याचे पाणी, गटार, स्वच्छता व पार्किंग हे प्रचाराचे मुद्दे प्रामुख्याने ऐरणीवर आले. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.