

Know The Work And Pay Of A Municipal Corporator In Maharashtra
Esakal
सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचा धुराळा सुरू आहे. युती आघाडीची समीकरणं बदलल्यानं पक्षांना उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागली. यामुळे अनेक ठिकाणी तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेल्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. काही ठिकाणी इच्छुकांनी पक्षांच्या कार्यालयासमोर राडाही घातला. नगरसेवक होण्यासाठी प्रभागांमध्ये सातत्यानं सक्रीय राहिल्यानंतर, काम केल्यानंतरही डावललं गेल्याची नाराजी अनेकांनी व्यक्त केलीय. राज्यभरात बऱ्याच ठिकाणी नाराजांनी घातलेल्या या राड्याची चर्चा होत आहे. पण तुम्हाला माहितीय आहे का नगरसेवकाची नेमकी कामं काय असतात? कोणत्या कामासाठी त्यांना सामान्य नागरीक निवडून देतात?