Assembly Election Result Updates : विविध ठिकाणी वेगवेगळे आकडे पाहून गोंधळ उडतोय? असे पाहा निवडणूक निकालांचे अचूक अपडेट्स

Assembly Election : या निवडणुकीचा पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल देखील म्हटलं जात आहे.
Assembly Election Result Updates
Assembly Election Result UpdateseSakal

Assembly Election Result Updates : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. यासाठी सकाळपासूनच मतमोजणी सुरू झाली असून, प्राथमिक कल देखील येण्यास सुरुवात झाली आहे.

मात्र, टीव्हीवर सगळीकडे वेगवेगळे आकडे दिसत असल्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळेच, निवडणुकांचे अगदी योग्य निकाल पाहण्यासाठी एक सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांमधील निवडणुकांचे निकाल आज समोर येणार आहेत. मिझोरम राज्यातील मतमोजणी ही सोमवारी पार पडणार आहे. आज होणाऱ्या मतमोजणीमधून अचूक निकालाचे अपडेट्स पाहण्यासाठी सर्वात विश्वासार्ह स्त्रोत हा निवडणुक आयोगाची वेबसाईट आहे. याठिकाणी निकाल पाहण्याची प्रक्रिया देखील अगदी सोपी आहे.

Assembly Election Result Updates
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : बीआरएस पुन्हा शर्यतीत, 49 जागांवर मिळवली आघाडी; भाजप ठरणार किंगमेकर?

या ठिकाणी पाहा निकाल

तुम्ही इलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटवर निकालाचे अपडेट्स पाहू शकता. यासाठी या लिंकवर क्लिक करा.

तुम्हाला जर मोबाईलवर निकालाचे अपडेट्स पहायचे असतील, तर त्यासाठी व्होटर हेल्पलाईन अ‍ॅपची मदत देखील घऊ शकता. हे अ‍ॅप गुगलच्या प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com