
पुण्यात सध्या पेट्रोलचे दर ९२.५४ रुपये प्रतिलिटर आहेत.
Union Budget 2021: पुणे : येत्या 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचं बजेट सादर होणार आहे. या बजेटमध्ये केंद्राकडून खूप अपेक्षा असल्या तरी सगळ्यांत मोठी अपेक्षा ही, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासंदर्भातील आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ झालीय. त्यामुळं बजेटकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी 'सकाळ'ला विशेष मुलाखत दिली.
- फक्कड बाबांनी राम मंदिरासाठी दिले १ कोटी; ६० वर्षांपासून राहत आहेत गुहेत!
दरम्यान, पुण्यात सध्या पेट्रोलचे दर ९२.५४ रुपये प्रतिलिटर आहेत. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. रुपया आणि अमेरिकन डॉलरचे विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक घडामोडी आणि इंधनाची मागणी या घटकांचा विचार करून पेट्रोल-डिझेलची किंमत निश्चित करण्यात येते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑईलची किंमत वाढली की, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होते. इंधनाच्या किंमतीत उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि डीलर कमिशनचा समावेश होतो. व्हॅट प्रत्येक राज्यात वेगवेगळा आकारण्यात येतो. उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि व्हॅट असे सर्व प्रकारचे कर लागू केल्यानंतर पेट्रोलची किरकोळ विक्री किंमत जवळपास दुप्पट होते.
- Budget 2021: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी गोंधळ; शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ खासदारांच्या घोषणा
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)