
सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने नुकतीच मुंबई हायकोर्टातील न्यायाधीश पदासाठी तीन वकिलांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामध्ये वकील अजित भगवानराव कडेठाणकर, सुशील मनोहर घोडेस्वार आणि आरती अरूण साठे यांचा समावेश आहे. त्यापैकी एका नावावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेसनेही यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणजे आरती अरूण साठे. साठेंची नेमणूक म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात अशी प्रतिक्रियाच रोहित पवारांनी दिली. पण कोणत आहेत आरती साठे ज्यांच्या न्यायाधीश म्हणून नेमणुकीला इतका विरोध होतोय?