Agariya Salt Workers : देशानं ज्यांचं मीठ खाल्लं, त्या लोकांनी नेमकं काय मिळवलं? मीठ बनवणाऱ्या लाखो कामगारांची वेदनादायक कहाणी

Agariya Salt Workers Gujarat : कच्छच्या रणात मीठ बनवणारे आगरिया मजूर नऊ महिने कष्ट करतात, पण आरोग्य आणि सुविधांपासून वंचित राहतात. त्यांच्या पिढ्यानपिढ्या चाललेल्या संघर्षाकडे सरकारचे दुर्लक्ष डोळ्यात पाणी आणते.
Agariya Salt Workers Gujarat

Agariya Salt Workers Gujarat

esakal

Updated on

Salt Workers Painful Story : मीठ म्हंटल की आपल्याला गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह आठवतो. 1930 मध्ये सविनय कायदेभंग करत त्यांनी सत्याग्रह केला होता. हा बंड होता जुलमी ब्रिटिशांच्या विरोधात. इंग्रज सरकारने मीठवर कर लावला होता. मीठ तर आपल्या जीवनातील अत्यावश्यक गोष्ट आहे मग हे इंग्रज कस काय यावर कर लावू शकतात..या विचारातून हे आंदोलन झाले होते. याची सुरुवात साबरमती(गुजरात) इथून झाली. हे आंदोलन कच्छ भागातून पुढे पुढे जात देशभर पसरले.

पण इतक्या वर्षानंतरही जिथे गुजरातच्या या कच्छ रणात जिथे पाणी आणि आकाश एकरूप होतात तिथे मीठाच्या चमकदार पांढऱ्या थराखाली दडलेले आहे एक कठोर जीवन. मीठात जीवनाचे सुख आहे, पण त्याच मीठात खोलवर वेदना देणारे दु:खही लपलेले आहे. हे दु:ख आहे गुजरातमधील लाखाहून अधिक आगरिया मीठ कामगारांचे ज्यांच्या नशिबात फक्त संघर्ष आणि तडजोड आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com