

What Is Delimitation in India? Meaning, Process, Benefits and Challenges Explained
eSakal
What Is Delimitation?: भारतात दर पाच वर्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदार आपल्या मतदारसंघातील प्रतिनिधी निवडतो. मात्र, काळानुसार देशाची लोकसंख्या बदलत असते. काही भागांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढते, तर काही भागांमध्ये तीच्या वाढीचा दर कमी राहतो. अशा वेळी प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची संख्या संतुलित ठेवण्यासाठी मतदारसंघांच्या सीमा नव्याने निश्चित कराव्या लागतात. या प्रक्रियेला मतदारसंघ पुनर्रचना किंवा परिसीमन (Delimitation) असे म्हणतात.