
Mumbai BMC Elections: मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यातील तणाव वाढत असताना, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक वाढत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. बीएमसी ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून, ही जिंकणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे स्वप्न आहे. यंदाच्या निवडणुकीत काय होणार? भाजपसमोर उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती पर्याय असू शकतो का? एकनाथ शिंदेंची मुंबईत किती ताकद आहे. हे समजून घेऊया.