ऍक्‍युपंक्‍चर व मॉक्‍सीबश्‍शन 

डॉ. आरती मिलिंद साठे
Friday, 15 November 2019

आपल्यापैकी बहुतेकांना एक्‍युपंक्‍चरविषयी माहिती झाली असेलच. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा ऍक्‍युपंक्‍चर पद्धती व तिच्या उपयोगाला मान्यता दिली आहे. 

आपल्यापैकी बहुतेकांना एक्‍युपंक्‍चरविषयी माहिती झाली असेलच. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा ऍक्‍युपंक्‍चर पद्धती व तिच्या उपयोगाला मान्यता दिली आहे. 

ऍक्‍युपंक्‍चरमध्ये रुग्णाच्या व्याधीचा इतिहास जाणून घेऊन त्या आजाराशी निगडित अशा बिंदूवर कमीत कमी दोन ते सोळा अथवा त्याहीपेक्षा जास्त अतिशय बारीक (0.25x25 mm) अशा निर्जंतुक सुया लावून 
1. नुसत्या 10-15 मिनिटे ठेवल्या जातात 
2. किंवा सुयातून मानवी शरीरास सुरक्षित असा विद्युतप्रवाह (20-25 MA) द्वारे 10 मिनिटे सोडला जातो. हा विद्युतप्रवाह रुग्णाला सहन होईल असा पहिल्याने व नंतर रुग्णाच्या सांगण्यावरून वाढवता येतो की जेणेकरून त्याला बरेच वाटते. किंवा 
3. त्या सुयांच्या टोकाशी औषधी वनस्पतीच्या पेटवलेला रोल धरला जातो. जेणेकरून रुग्णाला ऊब जाणवते. (सुईमार्फत) ज्याला मॉक्‍सीबश्‍शन असे म्हणतात व याचेही अतिशय चांगले परिणाम मिळतात. 
रुग्णाच्या बरे वाटण्यावर एक ते दहा अशी सीटिंग लागू शकतात. काहींना पुढे काही महिन्यांनी कमी सीटिंग पुन्हा आवश्‍यक असतात. 
आता या पद्धतीने बरे का वाटते यामागे शास्त्रीय कारणे आहेत. ती बघू. 
1. गेट कंट्रोल थिअरी (Gate control Theory) ः- 
यानुसार वेदनेची जाणीव मेंदूपर्यंत जाणे आणि मग ती रुग्णाला जाणवणे हे वेदनेची जागा ते सेरिब्रल कॉर्टेक्‍सपर्यंत एक संदेशवहन यंत्रणा असते. त्यामुळे शक्‍य होते. मज्जारज्जूमधील (spinal cord) एक कार्यान्वित स्थाना (Functional gate) वेदनेच्या जाणीवा नियंत्रित, फेरफारित अथवा सुधारित होतात. या स्थानापासून वेदनेच्या जाणिवा मज्जारज्जूमधून बाजू क्रॉस करून थॅलॅमस (Thalamus) व नंतर सेरेबल कॉर्टेक्‍स (Cerebral cortex) पर्यंत जातात. जेव्हा ऍक्‍युपंक्‍चरच्या सुया बिंदूवर लावल्या जातात तेव्हा या बिंदूमधूनही जाणीवा निर्माण होऊन असाच प्रवास करतात. जेव्हा कार्यान्वित स्थानाजवळ वेदनेच्या जाणिवा व सुयांमुळे होणाऱ्या जाणिवा यांची गर्दी होते व या दोन्हींचा वहनदर (Rate of conduction) वेगवेगळा असतो. त्यामुळे हे स्थान (Gate) जॅम अथवा बंद होते. परिणामतः वेदनेच्या जाणिवा अडवल्या जातात. वेदनेची सहनशक्ती (Pain threshold) वाढतो व रुग्णाला वेदना जाणवत नाही. 
2. द एन्डॉरफीन रिलीज थिअरी ः- (The endorphine release theory) 
यानुसार सुयांमुळे स्नायूमधील ग्रहणकेंद्र उद्दीपित (stimulation of sensory receptor) पिप्युटरी ग्रंथीला एन्डॉरफीन नावाचे रसायन स्त्रवायचा संदेश मिळतो जे वेदनेच्या पेशीतील ग्रहणकेंद्र (opiate receptors in the pain cells) अडवते. त्यामुळे वेदनेची जाणीव रुग्णाला होऊ शकत नाही. याचा परिणाम म्हणून रुग्ण शांत झोप लागली (quality of sleep) असे सांगतात. काहींना तर ऍक्‍युपंक्‍चरचे सीटिंग चालू असतानाच झोप लागल्याचा अनुभव आहे. 
सर्व प्रकारच्या दुखी, सूज, वजन आटोक्‍यात आणणे 30 अनेक तसेच प्रतिबंधात्मक ऍक्‍युपंक्‍चर अतिशय उपयोगी आहे. 
मॉक्‍सीबश्‍शन (Moxibustion) 
ही पद्धत बऱ्याच सौम्य व्याधीमध्ये उपचार म्हणून वापरली जाते. ऍक्‍युपंक्‍चर बिंदूवर सुया लावून त्यांना औषधी वनस्पतीचा रोल पेटवून उष्णता देतात. ही औषधी वनस्पती म्हणजे "नागदमणी' अथवा (Artemisa vulgaris) असून तिच्या सुकलेल्या पानाची पावडर बनवून ती रोलच्या रुपात (Moxa-stick) वापरतात. त्या पावडरीला moxa wool असेही म्हणतात. या वनस्पतीच्या पावडरमध्ये ऊब आणणे, वाहिन्यांमधील (Channels) दूर करणे, थंडी व ओळ (damfness) काढण्यास मदत करणे इत्यादी 30 गुण आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यामुळे शरीराचा जो भाग प्रभावित झाला आहे तेथील ऊर्जा परत आणण्याचे काम केले जाते. थंडपणा काढून टाकणे व साठलेले रक्त सरकवण्याचे काम अतिशय लाभदायक ठरते. 
उपचार देताना रुग्णाला योग्य स्थितीत बसवून अथवा झोपवून निर्जंतुक सुया (2 ते 16 अथवा अधिक) लावल्या जातात. त्यानंतर मोक्‍सा रोल पेटवून तो रुग्णाला इजा होणार नाही याची काळजी घेऊन सुईच्या मोकळ्या टोकाशी धरला जातो. रोलची राख रुग्णाच्या अंगावर पडू नये म्हणून पुठ्ठा जाड कागद लावला जातो किंवा धरला जातो. रुग्णाला सुई लावलेल्या ठिकाणी उबदार वाटेपर्यंत उष्णता दिली जाते. अशा तऱ्हेने प्रत्येक सुईला केले जाते. रुग्णांना या उबेमुळे अतिशय बरे वाटते. गुडघेदुखीच्या रुग्णाला गुडघ्याचे आखडलेले स्नायू मोकळे होऊन गुडघा जवळ घ्यायला मदत होते व गुडघा कमी दुखतो. सुजेमध्येही दुखी कमी घेऊन मग हळूहळू सूज कमी होते. यामध्ये कोणत्याही प्रकारची इजा, भाजणे असे रुग्णाला होत नाही हे लक्षात घ्यावे. 
पाठीचा कणा ताठरलेल्या रुग्णामध्ये सरांनी दाखवलेले प्रात्यक्षिक बघताना अक्षरशः रोमांच उभे राहिले. यामध्ये पूर्ण कण्यावर किसलेल्या आल्याचा योग्य जाडीचा धर पसरण्यात येतो. त्यावर सुटी मोक्‍स वूल परसण्यात येते व नंतर ती पेटवली जाते. रुग्ण अगदी व्यवस्थित उठला अर्थात हे कौशल्याचे व अनुभवाने करण्याचे उपचार असल्यामुळे कोणीही हे घरी करु नये. 
वरील सर्व माहितीच्या अनुषंगाने ऍक्‍युपंक्‍चर व मॉक्‍सीबश्‍शन पद्धतीचा उपयोग तज्ज्ञांकडून करून रुग्णांनी जरूर लाभ घ्यावा. त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क हे त्या तज्ज्ञावर अवलंबून असते. तसेच यासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या किमतीवरही अवलंबून असते. तरीही एकदा हे उपचार घेऊन बघावेत व फायदा मिळाल्यास जरुर पुढे जावे. 
- डॉ. आरती मिलिंद साठे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acupuncture and Moxibustion article written by Dr Aratee Milind Sathe