स्वमग्नता आणि लक्षणे

लहान मुलांच्या आजारांमध्ये ऑटिझमचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. ऑटिझम म्हणजे साध्या सोप्या भाषेत स्वमग्नता असा होय.
autism
autismsakal

- डॉ. अश्विनी अक्षय गुगळे, एम. डी. (होम)

लहान मुलांच्या आजारांमध्ये ऑटिझमचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. ऑटिझम म्हणजे साध्या सोप्या भाषेत स्वमग्नता असा होय. मुलांना ऑटिझम असल्यास ते स्वतःमध्येच मग्न असतात. हा एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असून ही मुले मनोबौद्धिकरीत्या अविकसित असतात.

काही संशोधनांमध्ये असे दिसून आले; हजार मुलांमागे सरासरी आठ मुले ऑटिझमची आढळतात. पालकांनी जागरूकतेने आपल्या मुलाची गरज समजून योग्य ते उपचार करून घेणे अत्यावश्यक आहे. साधारणतः १ ते ३ वयोगटातील मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे दिसायला सुरुवात होते.

ऑटिझमची लक्षणे

  • ऑटिझम डिसऑर्डरची लक्षणे ३ टप्यात दिसून येतात.

  • पहिल्या टप्यात लक्षणांची तीव्रता खूप कमी असते. पालकांना त्याची जाणीव देखील होत नाही.

  • दुसऱ्या टप्प्यात मुले मोठी होऊ लागतात त्यानुसार ऑटिझमची लक्षणे डोके वर काढतात.

  • तिसऱ्या टप्यात मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे पहिल्या वर्षापासूनच स्पष्टपणे आढळू लागतात.

  • ऑटिस्टिक मुले हाक मारल्यावर प्रतिसाद देत नाहीत, आपले बोलणे ऐकून देखील न ऐकल्यासारखे करतात.

  • ऑटिस्टिक मुले इतरांशी डोळ्यात डोळे घालून बोलण्यास घाबरतात किंवा लाजतात.

  • ही मुले एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करतात. काही गोष्टी त्यांना ठरल्याप्रमाणेच करायच्या असतात. त्यांना बदल अजिबात आवडत नाहीत.

  • ही मुले असंबंध बडबड करतात, तसेच पुन्हा पुन्हा तेच शब्द बोलत राहतात.

  • अर्थपूर्ण बोलणे वयाच्या ३ वर्षानंतरही जमत नाही.

  • वारंवार त्यांना सूचना द्याव्या लागतात.

  • अशी मुले एकट्याने राहण्यास प्राधान्य देतात.

ऑटिझमची कारणे

हा आजार होण्याचे महत्त्वाचे कारण आनुवंशिकता.

याशिवाय २६ आठवड्याआधीच डिलिव्हरी होणे, बाळाचे कमी वजन, गर्भावस्थेत असलेल्या गंभीर समस्या, जन्मा वेळीस ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा.

मुलांचा आहार

या मुलांना आहारामध्ये खूप काही बंधन नाही. परंतु त्यांचा आहार हा संतुलित असावा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि मिनरल्सनी प्रमाणबद्ध असावा. या मुलांच्या आहारात जास्तीत जास्त प्रथिने युक्त पदार्थांचा समावेश केल्यास त्यांच्या मांसपेशींची वाढ चांगली होते.

आहारात काय देऊ नये?

१. ऑटिस्टिक मुलांचे डाएट हे ग्लूटेन फ्री असावे, म्हणजेच गहू , बार्ली इ. पदार्थ त्यांना देणे टाळावे. कारण यांच्यातील ग्लूटेन घटक पचण्यास कठीण असतो व त्याचा परिणाम त्यांच्या प्रतिकार शक्तीवर होतो.

२. अति दुग्धमय पदार्थ देणे टाळावे, कारण यातील काही घटक चिडचिडेपणा, हट्टीपणा, संथपणा इ. लक्षणे वाढवतात आणि एकाग्रता कमी करतात.

३. साखर ऑटिस्टिक मुलांना देऊच नये. चॉकलेट्स, कॅन्डीज, पेस्ट्रीज, केक्स, बर्फी इ. कारण साखरेतील घटक मुलांच्या एकाग्रतेवर वाईट परिणाम घडवून आणतात. आहारातील साखर बंद केल्यास त्याच्या एकाग्रतेत लगेचच चांगला परिमाण दिसू लागतो.

पालकांची आणि समाजाची जबाबदारी

पालकांनी न घाबरता ऑटिझम बाबतीत जागरूक राहून ऑटिझमची लक्षणे आढळल्यास पाल्यावर योग्य ते उपचार करायला हवेत. परंतु पालक वर्ग ‘समाज काय म्हणेल’ याकडे झुकलेला दिसतो. अनेक पालकांचा त्यांच्या मुलांना ऑटिझमसारखी समस्या असतानाही सामान्य शाळांमध्येच घालण्याचा अट्टहास असतो. मुळात अशा मुलांची वाढ सामान्य शाळांमध्ये होऊच शकत नाही. विशेष गरजाधारक मुलांना विशेष शिक्षणाची गरज असते हे पालकांनी

समजून घेणे आवश्यक आहे. कारण अशा शाळांमध्ये त्यांच्या मनोबौद्धिकतेचा विचार करून त्यांना शिकवले जाते जे सामान्य शाळेत शक्य नसते. म्हणून ऑटिस्टिक मुलांना योग्य शाळेत रुजू करणे ही पालकांची जबाबदारी आहे.

उपचारासोबतच अशा मुलांना कुटुंबाच्या प्रेमाची आणि आधाराची अत्यंत गरज असते. अशी मुले स्वतःला योग्य रित्या व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे अनेक पालकांची चिडचिड होते. परंतु ही मुले जाणीवपूर्वक असे वर्तन करत नसल्याचे पालकांनी समजून घ्यावे. ऑटिझममध्ये मुलांचा मेंदू त्यांच्या भावना व्यक्त करण्यास सक्षम नसतो. म्हणूनच आपण त्यांना समजून नवनवीन गोष्टी शिकवण्यास मदत करावी, ज्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

समाजानेही या मुलांचा दिलखुलासपणे स्वीकार करावा. कारण ऑटिस्टिक मुले सांभाळणे हे कोणत्याही पालकांसाठी मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत समाजाने त्या मुलांच्या पालकांना भावनिक आधार दिल्यास त्यांना प्रोत्साहन मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com