जिवाणू आणि कृमींचा धुमाकूळ

मागच्या भागात आपण कृमी व जिवाणूंविषयी थोडी माहिती घेतली. आता पुढे पाहू या. प्रत्येक कृमी किंवा जिवाणू आपल्या शरीरासाठी वाईटच असतो असे नव्हे.
Bacteria
Bacteriasakal

- डॉ. मालविका तांबे

मागच्या भागात आपण कृमी व जिवाणूंविषयी थोडी माहिती घेतली. आता पुढे पाहू या. प्रत्येक कृमी किंवा जिवाणू आपल्या शरीरासाठी वाईटच असतो असे नव्हे. आयुर्वेदामध्ये जिवाणूंचा शरीरावर होणाऱ्या परिणामांनुसारही त्यांचे वर्गीकरण केलेले आहे.

१. सहज - म्हणजे जे नैसर्गिक आहे, जे आपल्याबरोबर असते व आपल्याला मदत करते.

२. वैकारिक - जे शरीरामध्ये बिघाड उत्पन्न करते, आजार आणते.

जिवाणू आणि कृमी वाइटच असतात असा गैरसमज आधुनिक शास्त्रानुसारही काही दशकांपूर्वी कमी झालेला आहे. सहसा सगळे जिवाणू (बॅक्टेरिया) वाईट नसतात, उलट काही जिवाणू आपल्याला मदत करतात हे कळल्यानंतर काही वर्षांपासून प्रोबायोटिकचे फॅड सुरू झालेले आहे.

प्राचीन काळातही पचनसंस्था, प्रतिकारशक्ती, औषधनिर्माण इत्यादीसारख्या महत्त्वाच्या शाखांमध्ये आयुर्वेदाने जिवाणूंचा सकारात्मकपणे वापर करून घेतलेला दिसतो. एवढेच नव्हे तर आधुनिक संशोधनानुसार जन्माच्या वेळी नैसर्गिक जननमार्गातून बाहेर येत असताना तसेच कुठल्या वातावरणात जन्म होतो आहे.

त्यानुसार जन्म झाल्यावर आईच्या दुधातून बाळाच्या शरीरात मुख्यत्वे पचनसंस्थेमध्ये वेगवेगळे मदत करणारे जिवाणू पुरवले जातात असे आढळून आले आहे. यावरून आयुर्वेदामध्ये सहज शब्द वापरलेला आहे. म्हणजे जे जन्मापासून आपल्या बरोबर आहेत हे सिद्ध होते. हे जिवाणू साधारणतः २-३ वर्षांत शरीरात स्थापित होतात.

जिवाणू शरीराच्या महत्त्वाच्या चयापचय क्रियांमध्ये मदत करतात, शरीराची प्रतिकारशक्ती कशा प्रकारची असेल ते ठरवितात, बाहेरून येणाऱ्या जिवाणूंशी कसा लढा द्यायचा हे ठरवितात, पचनसंस्थेत होणाऱ्या संक्रामक रोगांपासून बचाव करण्यासाठी मदत करतात, पचनसंस्थेत आलेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन करून शरारीत कसे शोषले जाईल यावर नियंत्रण ठेवतात.

बरीच जीवनसत्त्वे, कर्बोदके, फॅट यांचे पचन करून ते शरीरात कशा प्रकारे घेतले जाईल हे शरीरात असलेल्या जिवाणूंवर अवलंबून असते. इतकचे नव्हे तर कर्करोग, दमा, मधुमेह, पार्किनन्स, वजन वाढणे, रक्तदाब, ऑटिझम वगैरे बऱ्याच मोठ्या आजारांशी जिवाणूंचा संबंध आढळून आलेला आहे, यावर आज जगभर मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे.

आरोग्याचा मुळापासून विचार करायचा झाला तर बऱ्याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. जन्म नैसर्गिक आहे की शल्यकर्माने, बाळाला आईचे दूध दिले की फॉर्म्युला मिल्क, बाळ आईच्या दुधावरून बाहेरच्या अन्नाकडे जात असताना कशा प्रकारचा अन्नक्रम योजला गेला या सगळ्यांवर आरोग्याचा पाया ठरत असतो.

वैकारिक जिवाणू व कृमी शरीरात किती प्रकारचे आजेर निर्माण करू शकतील याबद्दल लिहायला किती तरी वेळ लागेल. पँडेमिकमधून बाहेर पडून आपण नुकताच सुटकेचा श्र्वास घेतलेला आहे. त्यामुळे असा आजार किती त्रासदायक ठरू शकतो हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. नाना प्रकारचे जिवाणू व विषाणू (बॅक्टेरिया व व्हायरस) आपल्यावर सतत आक्रमण करतच असतात. त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती कशी वाढवायची ते आपण पुढे पाहू.

आयुर्वेदात अजून एक प्रकारचे वर्गीकरण दृश्य (डोळ्यांना दिसणारे) व अदृश्य (डोळ्यांना न दिसणारे) अशा प्रकारही केलेले आहे. सगळ्या प्रकारचे जिवाणू व विषाणू अदृश्य वर्गीकरणात येऊ शकतात.

जंतांवरचे उपचार - आचार्य चरकांनी तीन मूळ उपचार सांगितलेले आहेत.

तत्र सर्वक्रिमिणाम् अपकर्षणमेवादितः कार्यं ततः ।

प्रकृतिविघातोऽनन्तरं निदानोक्तानां

भावानाम् उपसेनाम् इति ।।.... चरक चिकित्सास्थान

१. अपकर्षण - जंत शरीराबाहेर काढून टाकणे.

२. प्रकतीविघात - आजार निर्माण करणाऱ्या कृमी वा जिवाणूंना पोषक असलेल्या वातावरणापासून वंचित ठेवणे, जेणेकरून त्यांचा नाश होईल.

३. निदानपरिवर्जन - जे कारण जिवाणूंना उत्पन्न करत आहे त्यापासून लांब राहणे व त्या कारणांवर उपचार करणे.

हे तिन्ही आपण विस्तारपूर्वक समजून घेऊ या.

कृमींना बाहेर काढण्याकरता ‘संशोधन’ हा उपाय हा सगळ्यांत उत्तम सांगितलेला आहे. शरीराच्या आत राहणाऱ्या कृमींना च्युत करण्याकरता म्हणजे बाहेर काढण्याकरता वमन, विरेचन श्रेष्ठ होत. यासाठी स्नेहन, स्वेदन करून कृमीनाशक द्रव्यांच्या काढ्याचे वमन देऊन तोंडाद्वारे कृमी बाहेर काढणे, विरेचन देऊन शौचामार्गे कृमी बाहेर काढणे, शिरोविरेचन (कृमी बाहेर काढण्याकरता नाकाचा वापर करणे), आस्थापन बस्ती देणे (पक्वाशयाच्या माध्यमातून कृमीचा घात करणे) वगैरेंची मदत घेता येते.

उवा, लिखा वगैरे कृमी आपल्याला हाताने बाहेर काढून टाकता येतात. त्वचेवर जिवाणूंमुळे वारंवार होणारा विकार असल्यास संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारख्या शास्त्रोक्त सिद्ध तेलाने अभ्यंग केल्यास त्रास कमी व्हायला मदत मिळते. संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेलासारखे तेल नियमित केसांच्या मुळाशी चोळून लावल्यास तेथील प्रतिकारशक्ती वाढून उवा, लिखा वगैरेंचा त्रास कमी होण्यासाठी मदत मिळते.

संतुलन फेमिसॅन तेलासारख्या सिद्ध शास्त्रोक्त तेलाच्या योनीपिचूच्या वापराने स्त्रियांमध्ये योनीमार्गात संक्रमण होण्यास प्रतिबंध होतो. तसेच पुरुषांनी संतुलन पुरुषम् तेल नियमितपणे जननांगावर वापरणे चांगले. नस्यसॅन घृतासारखे औषधी तूप वा तेल नाकात टाकणे, कानात संतुलन श्रुती तेलासारखे तेल टाकणे, तसेच डोळ्यांचा संक्रमणापासून वाचवण्याकरता संतुलन सुनयन तेल नियमितपणे डोळ्यांत घालणे योग्य ठरू शकते.

आहाराच्या दृष्टीने विचार केला तर स्वयंपाकघर कृमीनाशक गोष्टींनी परिपूर्ण असते. हिंग, हळद, काळी मिरी, ओवा, मोहरी, जिरे ही प्रत्येक स्वयंपाकघरात असणारी द्रव्ये जंतुघ्न असतात, त्यामुळे या गोष्टी उत्तम गुणवत्तेच्या वापरणेच इष्ट. सैंधव, लसूण, कढीपत्ता, तीळ, केशर, कुळीथ, कडुनिंब,शेवगा, मुळा, आले, डाळिंब, कारले, या गोष्टी जंतुघ्न असल्याने यांचाही वापर नियमित करणे चांगले.

आहारातील सर्वांत सोपे प्रोबायोटिक आहे, दही किंवा ताक. घरी लावलेले ताजे दही व दही घुसळून केलेले ताक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगाचे असते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. सकाळी घेतल्या जाणाऱ्या पंचामृतात एक चमचा दही व केशरअसते. केशर चुकीचे जिवाणू कमी करते व दह्यात असलेले जिवाणू शरीरात असलेल्या चांगल्या जिवाणूंना पोषक ठरते.

दुपारच्या जेवणानंतर एक वाटी ताक पिणे आरोग्याचसाठी हितकर सांगितलेले आहे. ताक जिरे पूड व सैंधव मीठ वा काळे मीठ घालून घेतल्यास पचनाला मदत होते तसेच कृमीरोगाला प्रतिबंध होतो. कृमी होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी ताकात बडीशेप, ओवा, हिंग वगैरेंचे चूर्ण टाकून घेतल्यास फायदा होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com