Health Care News : जिवाणू आणि कृमींचा धुमाकूळ

मागच्या भागात आपण पाहिले की ताक व दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक आहेत. आजकाल निरनिराळ्या प्रकारची प्रोबायोटिक्स बाजारात उपलब्ध आहेत.
Bacteria
Bacteriasakal

- डॉ. मालविका तांबे

मागच्या भागात आपण पाहिले की ताक व दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक आहेत. आजकाल निरनिराळ्या प्रकारची प्रोबायोटिक्स बाजारात उपलब्ध आहेत. पण त्यांच्यात कुठल्या प्रकारचे बॅक्टेरिया टाकलेले आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते. अगदी प्रसिद्ध कंपन्यांच्या प्रोबायोटिक्समध्येसुद्धा केवळ एक वा दोन प्रकारचे बॅक्टेरिया टाकलेले आढळतात. त्यामुळे घरी केलेले नैसर्गिक प्रोबायोटिक नियमितपणे घेणे हेच आरोग्याच्या दृष्टीने जास्त फायदेशीर ठरेल.

आधीच्या लेखात सांगितले होते की शेवग्याच्या शेंगा कृमीघ्न असतात. शेवग्याच्या शेंगा टाकून केलेली आमटी वा कढी अधून मधून आहारात समाविष्ट केल्यास पचनाच्या व कृमींच्या दृष्टीने आरोग्याला फायदा होतो. शेवग्याच्या शेंगा पाण्यात उकडाव्या, शेंगा शिजल्यावर उरलेले पाणी थोडे सैंधव व जिरेपूड टाकून घेतल्याने जंत कमी होताना दिसतात.

कडुनिंब जंतुघ्न भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या कोवळ्या पानांची चटणी खाण्याची प्रथा आहे. जंत होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी किंवा त्वचेवर कुठल्याही प्रकारचे संक्रमण असलेल्यांनी कडुनिंबाची काही कोवळी पाने खाण्याचा उपयोग होतो. त्वचेवर बॅक्टेरियल संक्रमणाचा त्रास असणाऱ्यांनी स्नानाच्या पाण्यात कडुनिंबाच्या पानांचा काढा टाकून त्या पाण्याने स्नान करण्याचा उपयोग होतो.

  • कारले जंतुघ्न असल्यामुळे कारल्याच्या पानांचा रस पिण्याने किंवा मुळ्याचा रस मधात मिसळून घेण्याने जंत पडून जाण्यास मदत मिळते.

  • जमत असेल त्यांनी लसणाची एक पाकळी तुपात तळून सकाळ-संध्याकाळ महिमाभर घेतल्याने जंत कमी होतात. लहान मुलांना जंतांपासून लांब ठेवण्यासाठी त्यांना सुरुवातीपासून बाळगुटी देण्याचा सल्ला दिला जातो.

  • बाळगुटीमध्ये विडंग, सुंठ, सागरगोटा वगैरे कृमीनाशक गोष्टींचा वापर केलेला असतो. तसेच लहान मुलांचे पिण्याचे पाणी विडंग, बडीशेप, ओवा वगैरे घालून उकळून घेतलेले असणे आरोग्याच्या दृष्टीने हितकर असते.

  • मोठ्यांनीही अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधात मिसळून रोज सकाळ घेतल्याने जंतांचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. प्रत्येकानेच दोन-तीन महिन्यांनी विडंगारिष्टासारखे आसव आठवडा-पंधरा दिवस घेणे एकूण आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. लहान मुलांनाही दर दोन-तीन महिन्यांनी पंधरा दिवस विडंगारिष्ट नक्की द्यावे.

  • कृमी झाल्याचे निदान झालेल्यांना कृमीकुठार रस, कृमी मुद्गर रस वगैरे औषधे घेणे लाभदायक ठरते. कृमी होण्याची सवय मोडण्याकरता जंतुघ्न उपचार म्हणून गोमूत्राचा वापर करता येऊ शकतो. रोज सकाळी न्याहारीच्या आधी पाच चमचे ताजे गोमूत्र पाच चमचे पाण्यात मिसळून घेणे चांगले. लहान मुलांना लहानपणापासूनच गोमूत्र घेण्याची सवय लावल्यास पुढे त्यांचा ‘ना-ना’चा पाढा येत नाही. बऱ्यात संतुलन बालकांना (दांपत्याने संतुलनमध्ये उपचार (गर्भसंस्कार) घेऊन जन्माला आलेली बालके) लहानपणापासून गोमूत्र घेण्याची सवय असल्यामुळे त्यांना जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी झालेली आढळते. जंत होण्याची सवय असल्यास पंधरा दिवसातून एकदा तरी पोट साफ होण्याचे औषध नक्की घ्यावे. याकरता आल्याच्या चहातून १-२ चमचे एरंडेल, योगसारकसारखे एखादे सारक चूर्ण घेण्याची मदत होऊ शकेल.

जंत झालेल्यांनी किंवा जंत होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी तांबडा भोपळा, रताळे, उडीद, अळू, वाल, मटार, चवळी, अंडी, मांसाहार शक्यतो टाळणेच बरे. अति प्रमाणात मधुर, स्निग्ध पदार्थ खाणाऱ्यांना, दिवस झोपणाऱ्यांना, बाहेरचे अन्न अति प्रमाणात सेवन करणाऱ्यांनीही या गोष्टी टाळणेच बरे.

आपण आपल्या जन्मापासूनच बॅक्टेरिया व व्हायरस यांच्याबरोबर राहत आलेलो आहोत, पण सध्याच्या काळात विशेषतः कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर एक थोडी चुकीचा गोष्ट लक्षात येते की लोक स्वच्छतेकडे व सॅनेटायझेशनकडे जरा जास्तच लक्ष द्यायला लागलेले आहेत एक लक्षात ठेवायला हवे की जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करतो तेव्हा त्याचे परिणाम फार चांगले होत नाहीत. यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करू.

1) आपण या बॅक्टेरिया व व्हायरसबरोबर हजारो वर्षे राहत आलेलो आहोत, त्यांना फक्त पळविण्यापेक्षा स्वतःच्या प्रतिकारशक्तीकडे लक्ष देणे अधिक योग्य. म्हणून त्यांनाघाबरण्याऐवजी स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवावी हे प्रत्येकाने समजले पाहिजे.

2) छोटा-मोठा त्रास झाला तर लगेच अँटिबायॉटिक्स घेण्याकडे वाढत असणारा कल कमी करण्याची गरज आहे. विशेषतः लहान मुलांना जरा सर्दी-खोकला झाला की लगेच अँटिबायॉटिक्स दिली जातात असे पाहण्यात येते. यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होतेच, पण शरीरात असलेले चांगले बॅक्टेरिया व्यवस्थित कार करेनासे होतात, पर्यायाने शरीरात निरनिराळे आजार आपले पाय पसरवू लागतात. त्यामुळे अँटिबायॉटिक्सचा अनावश्यक वापर कमी करण्याची गरज आहे.

3) सध्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी अँटी-बॅक्टेरियल टाकण्याची फॅशन झाली आहे. उदा. आपण वापरत असलेल्या साबणांत अँटी-बॅक्टेरियल टाकतातच, पण फोन, चादरी, चप्पला, कार्पेट वगैरेंमध्ये अँटी-बॅक्टेरियल टाकण्याकडे कल वाढत आहे. खरे असे करण्याची गरज नाही, जेथे गरज असेल तेथेच तलवार काढावी हे प्रत्येकानेच लक्षात ठेवायला हवे.

4) स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, पण स्वच्छतेच्या नावाखाली नको तितक्या वेळा हात धुणे, अति प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करणे, हे तब्येतासाठी, त्वचेसाठी चांगले नसते. अन्नाला हात लावायच्या आधी, स्वयंपाक करण्याआधी, काही खाण्याआधी काटाक्षाने हात धुवावे, पण सतत हात धुण्याची सवय कमी करण्याची गरज आहे.

आयुर्वेदामध्ये धूपन खूप महत्त्वाचे सांगितलेले आहे. शक्य झाल्यास दिवसातून एकदा तरी घरात संतुलन प्युरिफायर किंवा संतुलन वरशिपसारखा धूप करण्याचा सल्ला आम्ही संतुलनमध्ये येणाऱ्यांना देतो. घरात लहान मुले असल्यास संतुलन टेंडरनेस धुपाचा वापर केल्याने मुले सर्दी-खोकल्यापासून चार हात लांब राहतात असा अनेकांचा अनुभव आहे.

स्त्रियांच्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने त्यांना संतुलन शक्ती धुपासारखा धूप वापरल्याचा फायदा होतो असे अनेक महिला सांगतात. धूप नैसर्गिक द्रव्यांपासून केलेले असले तर त्याचा वातावरणावाही त्रासदायक ठरत नाही. धूप करणे अत्यंत सोपे असते. त्यामुळे रोज घरात धूप करण्याची सुरुवात ज्यांना करता येईल त्यांनी करणे उत्तम.

आपल्या आजूबाजूला चाललेल्या जिवाणू व कृमींच्या धुमाकुळात सुद्धा आपले कोण मित्र आहे हे ओळखणे गरजेचे आहे. हे नक्की की, त्रास देणारे बॅक्टेरिया व व्हायरस खूप आहेत, पण त्यांना काढत असताना आपले मित्र बॅक्टेरिया मरत नाहीत ना याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. नाहीतरी न विचार करता यांच्यावर बंदूक चालवली तर आपले मित्रही बळी जातील हे विसरून चालणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com