पावसाळ्यात कपड्यांमधून दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' सहा सोप्या टिप्स |lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bad smell from clothes

पावसाळ्यात कपड्यांमधून दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' सहा सोप्या टिप्स

पावसाळा आला की अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात आपण कितीदाही कपडे धुतले तरी कपड्यातून उग्र दुर्गंध येतो. योग्य ऊन न मिळाल्याने कपड्यातून उग्र दुर्गंध येतो. हेच कपडे काही वेळ उन्हात ठेवल्यास तो दुर्गंध संपतो, परंतु कपड्यांमधून येणारा हा दुर्गंध कायमचा दूर व्हावा, अशी अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही पावसाळ्यात कपड्यांमधून येणाऱ्या या दुर्गंधीपासून सुटका मिळवायची असेल, तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

हेही वाचा: ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी नवे नियम लागू

१.एकत्र मशीनमध्ये कपडे गोळा करू नका

आपल्यापैकी बरेच जण कपडे वापरल्यानंतर धुण्याकरीता थेट मशिनमध्ये कपडे घालतात. पण एकत्र मशीनमध्ये कपडे गोळा करू नका.असे केल्यास पावसाळ्यात तुमच्या कपड्यांना दुर्गंधी येईल.

२. लिंबूचा वापर करा.

लिंबू हे आम्ल पदार्थ आहे म्हणून ते बुरशी सहज नष्ट करू शकते. कपड्यांना दुर्गंधीपासून वाचवण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात कपडे घाला आणि नंतर धुवा किंवा ज्या ठिकाणी दुर्गंधी येते त्या कपड्यांवर लिंबूचा रस लावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

३. बेकींग सोडा

बेकींग सोडा कपड्यांमधून दुर्गंधी नष्ट करतात आणि दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया मारतात. म्हणून, एक बादली पाण्यात 1 चमचे बेकींग सोडा टाका आणि त्यात कपडे थोडा वेळ भिजवा. त्यानंतर त्यांना साध्या पाण्याने धुवा.

४. चॉक किंवा सिलिकॉन पाऊच वापरा

चॉक किंवा सिलिकॉन पाऊच कपड्यांमधील दुर्गंधी शोषून घेऊ शकतात, त्यामुळे तुमचे कपडे कोरडे आणि सुगंधित करण्यासाठी चॉक किंवा सिलिकॉन पाऊच कपाटात ठेवा. असे केल्याने कपड्यांना वास येणार नाही.

हेही वाचा: ....म्हणून हा मुलगा घोड्यावरून फूड डिलिव्हरीसाठी निघाला

५. खोलीत कपडे वाळवा

पावसात ऊन कमी पडतं, त्यामुळे कपडे मशीनमध्ये सुकवण्यापेक्षा चांगले वेंटिलेशन असलेल्या ठिकाणी वाळवा. जर खिडकी नसेल तर खोलीत कपडे वाळवा आणि पंखा चालू करा..

६. कपड्यांचा अतिवापर करू नका.

कपड्यांचा अतिवापर करू नका. अनेक वेळा लोक एकापेक्षा जास्त वेळा कपडे घालतात त्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढतात.

Web Title: Check Here How To Get Rid Of Bad Smell From Clothes During Monsoon Follow These Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..