प्रश्नोत्तरे

गेल्या आठवड्यात रक्ताची तपासणी केली असता थायरॉइडमध्ये टीएसएच वाढल्याचे आढळले आहे. यापुढे आयुष्यभर गोळी घ्यावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितलेले आहे.
TSH Test
TSH TestSakal

गेल्या आठवड्यात रक्ताची तपासणी केली असता थायरॉइडमध्ये टीएसएच वाढल्याचे आढळले आहे. यापुढे आयुष्यभर गोळी घ्यावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितलेले आहे. ही गोळी सुरू करण्याची माझी इच्छा नाही. माझ्या बऱ्याच मैत्रिणींना असा त्रास असल्याने त्या गोळ्या घेत आहेत, पण त्यांचा त्रास कमी होताना दिसत नाही. हा त्रास कमी होण्यासाठी कोणती औषधे घेता यातील तसेच खाण्या-पिण्याबाबत काय काळजी घ्यावी हे कृपया सांगावे.

- नियती गोयल, सातारा

उत्तर - सध्या थायरॉइडचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. धकाधकीचे आयुष्य, कामाचा ताण, खाण्या-पिण्याच्या व झोपण्याचा अनियमित वेळा यामुळे शरीरातील अग्नी व वात-पित्तदोषांशी संबंधित असलेला थायरॉइडचा त्रास झपाट्याने वाढताना दिसत आहे.

वय, प्रकृती, आनुवंशिकता, होणारा त्रास वगैरे गोष्टी बघून अशा प्रकारच्या त्रासांवर आयुर्वेदिक औषधांची योजना करता येऊ शकते. पाळीशी संबंधित काही त्रास दिसतो आहे का हे पाहणेही निदानाकरता आवश्यक असते. रोज न चुकता सूर्यनमस्कार व प्राणायाम यांचा सराव करावा.

रात्री झोपताना गळ्यावर खालून वर हलक्या हाताने संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेलासारखे तेल नियमाने लावावे. शरीरात स्त्री संतुलन राखण्याच्या दृष्टीने संतुलन फेमिसॅन तेलाचा पिचू योनाभीगा नियमित ठेवणे चांगले. त्रास कमी करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने संतुलन पंचकर्म व त्यानंतर उत्तरबस्ती अत्यंत लाभदायक ठरते.

रोजच्या आहारात खडे मीठ वापरावे. आंबवलेले पदार्थ, ढोबळी मिरची, मश्रूम, चवळी, छोले, फ्लॉवर, कोबी इत्यादी गोष्टी शक्यतो टाळाव्या. जेवणाच्या वेळा नियमित ठेवणे उत्तम. आहारात कोहळ्याच्या रसाचा किंवा भाजीचा समावेश असावा.

मला दोन वेळा कोविड होऊन गेला आहे. यानंतर मला श्र्वास घ्यायला त्रास होतो, काहीही काम करायला गेल्यास थकवा जाणवतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फुप्फुसांची ताकद कमी झालेली आहे, याकरता काय करता येईल? खूप त्रास झाला की इन्हेलरची मदत घेतो, त्यामुळे तात्पुरते बरे वाटते, कृपया मागदर्शन करावे.

- अनिल राव, हैदराबाद

उत्तर - कोविड होऊन गेल्यानंतर बरेच लोक थकवा व सर्दी-खोकल्याचा त्रास होणे, इनहेलर घेतला तरी तात्पुरते बरे वाटले तरी परत त्रास होणे अशी तक्रार करताना आढळतात. याकरिता फुप्फुसांची ताकद वाढवणे आवश्यक आहे.

यासाठी रोज सकाळी किमान दहा मिनिटे दीर्घश्र्वसनाचा सराव नक्की करावा. त्यानंतर संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल छातीवर हलक्या हाताने खालून वर या दिशेत लावावे. एकूणच प्रतिकारशक्ती नीट राहण्याच्या दृष्टीने संतुलन सीतोपलादीसारखे चूर्ण मध वा मध-तूप यात मिसळून घेणे चांगले.

ब्राँकोसॅन सिरपसारखे सिरप घेतल्यास अशा प्रकारे होणारे त्रास कमी होतात असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. रुईच्या ताज्या पानांवर संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल लावून पाने तव्यावर थोडे गरम करून छाती शेकावी.

त्याआधी छातीवर धोतराचे सुती फडके ठेवल्यास रुईच्या चिकाचा त्रास होणार नाही. नाकात नस्यसॅन घृत टाकण्याचाही फायदा होताना दिसेल. जमल्यास संतुलन शास्त्रोक्त पंचकर्म करून घेतलेले चांगले, जेणेकरून पंचकर्मादरम्यान केल्या गेलेल्या फुप्फुसांची ताकद वाढविण्याऱ्या उपचारांचा फायदा मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com