प्रश्नोत्तरे

माझे वय ३२ वर्षे आहे, तीन वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. आता आम्ही बाळाचा विचार करतो आहोत मला दिवसातून तीन-चार सिगरेट ओढण्याची सवय आहे.
cigarette smoking
cigarette smokingsakal

माझे वय ३२ वर्षे आहे, तीन वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. आता आम्ही बाळाचा विचार करतो आहोत मला दिवसातून तीन-चार सिगरेट ओढण्याची सवय आहे. ही सवय चुकीची आहे असे मला सांगितलेले आहे. पण गर्भारपण राहिल्यानंतर ही सवय सोडली तर चालू शकते का? गर्भवती राहण्यापूर्वी सिगरेट ओढत असल्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतो का? दुष्परिणाम कमी करण्याकरता काय उपाय करता येईल ?

- अमिता सारडा, नॉएडा

उत्तर : खरे तर धूम्रपान करणे स्त्री व पुरुष दोघांसाठी योग्य नाही. त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल आपण सर्व जागरूक आहोतच. गर्भ राहण्याआधी व नंतर धूम्रपान करणे अर्भकाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत अपायकारक ठरू शकते. ही सवय तुम्हाला जितक्या लवकर थांबवता येईल तितके बरे. याचे दुष्परिणाम कमी करण्याकरता गर्भ राहण्याआधी संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेतलेले उत्तम.

गर्भावस्थेत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची औषधे व उपचारयोजना करता येऊ शकते, जेणेकरून धूम्रपानाचे दुष्परिणाम बाळापर्यंत जाणार नाहीत. गर्भ राहण्याच्या कमीत कमी सहा महिने आधी धूम्रपान पूर्णपणे सोडलेले असावे. धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भारपणात मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते असे संशोधनात आढळून आलेले आहे. तज्ज्ञांचे व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन पूर्णपणे आयुर्वेदिक तयारी करून मगच गर्भधारणेकरता प्रयत्न करावा, असा माझा तुम्हाला सल्ला राहील.

मला गेले काही महिने मान दुखण्याचा त्रास होत होता. डॉक्टरांना दाखवले असता त्यांनी स्पाँडिलायटिस असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी घेतलेल्या औषधांमुळे ॲसिडिटी प्रचंड प्रमाणात वाढते आहे. गोळ्या घेतल्या की तात्पुरतेच बरे वाटते, यासाठी काही आयुर्वेदिक उपचार करता येईल का ?

- अभिजित पाटील, पुणे

उत्तर : शरीरात वातदोषाचे असंतुलन झाले की असा मान दुखण्याचा त्रास बऱ्याच लोकांना सध्याच्या काळात होताना दिसतो. फार जास्त ताण, संगणकावर फार वेळ बसणे, आहारात पोषक पदार्थांचा अभाव, खूप प्रमाणात प्रवास या सगळ्यांमुळे हा त्रास बळावत जातो आहे.

याकरता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी मान-पाठीवर संतुलन कुंडलिनी सिद्ध तेलासारखे तेल हलक्या हाताने जिरवावे. तेल फक्त मानेला न लावता संपूर्ण पाठीला तेल लावण्याचा जास्त फायदा होताना दिसतो. त्याचबरोबरीने तेल लावल्यानंतर एरंडाचा पाला वाफवून त्याचा शेक घेतला तर अधिक फायदा होऊ शकेल.

तज्ज्ञांकडून वातशामक बस्ती करून घेतल्याचाही उपयोग होताना दिसतो. संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म केल्यानंतर पाठीच्या कण्याला ताकद मिळण्यासाठी विविध उपचार करता येऊ शकतात, त्याचाही अलवंब केला तर चालू शकेल. आहारामध्ये गाईचे दूध, घरचे साजूक तूप, लोणी, बदाम, खारीक, डिंकाचे लाडू वगैरेंचा समावेश असलेला चांगला. संगणकावर फार काम होत असल्यास बसण्याची स्थिती बदलावी, तसेच मानेला मदत होईल अशा व्यायामाचा सुद्धा रोजच्या जीवनात समावेश करणे उत्तम राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com