प्रश्नोत्तरे

लहान मुलांचे पचन व्यवस्थित असणे हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे
hair issue Digestion child care
hair issue Digestion child care sakal

माझ्या मुलाचे वय चार वर्षे आहे. त्याचे केस सध्या पांढरे होऊ लागले आहेत. तसेच त्याच्या केसांत कोंडा असतो. तो खायला चिडचिड करत असतो. चकली, चिवडा वगैरे पदार्थ आवडीने खातो, पण व्यवस्थित आहार घेणे टाळतो. यासाठी मला काय करता येईल?

- उषा जाधव, डोंबिवली

उत्तर : लहान मुलांचे पचन व्यवस्थित असणे हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे मुलाच्या खाण्यापिण्याचा काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे ठरते. इतक्या कमी वयात त्याला बाहेरचे खाणे देणे टाळावे, शक्यतो घरचा वरण- भात, भाजी-पोळी, घरी बनविलेले फरसाण देणे चांगले. शरीरात उष्णता वाढली तर डोक्याच्या त्वचेवर कोरडेपणा येऊन अशा प्रकारे कोंडा तयार होऊ शकतो व कोरडेपणामुळे केसही पांढरे होतात.

पचनासाठी त्याला संतुलन बाल हर्बल सिरप द्यावे, जेणेकरून तो घरातील गोष्टी खायला तयार होईल. संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेलासारखे एखादे आयुर्वेदिक सिद्ध तेल रोज नियामाने त्याच्या केसांना लावावे, तसेच केस धुण्यासाठी शांपू किंवा साबणासारखी रासायनिक द्रव्ये वापरणे टाळावे,

त्याऐवजी संतुलन सुकेशासारखे नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेले उत्पादन वापरणे चांगले ठरेल. तसेच त्याला संतुलन कॅल्सिसॅन अर्धी गोळी व संतुलन पित्तशांती अर्धी गोळी सकाळ संध्याकाळ द्यायला सुरुवात करावी. चैतन्य कल्प टाकून दूध दिल्यासही त्याच्या एकूण वाढीकरता व आरोग्याकरता मदत होऊ शकेल.

माझा मुलगा सात महिन्यांचा आहे. त्याच्या जन्मानंतर मला फारसे दूध नसल्यामळे त्याला सुरुवातीपासून दुधाच्या पावडरपासून बनविलेले दूध देण्यात येत आहे. त्याला शौचाला कडक होते, तसेच कधी कधी त्याला २-३ दिवस शी होत नाही. सतत दुर्गंधयुक्त गॅसेस होतात. पोट हाताला टणक असलेले जाणवते. काय उपाय करता येऊ शकेल?

- मधुरिमा तळोजे, बारामती

उत्तर : लहान मुलांची पचनसंस्था अतिशय नाजूक असते म्हणून निसर्गाने त्यांच्यासाठी आईचे दूध तयार केलेले असते. शक्यतो पावडरपासून बनविलेले दूध मुलांना देऊ नये, कारण ते एकूणच आरोग्याकरता चांगले नसते. शक्य झाल्यास बाळाला गायीचे दूध द्यावे. पाऊण कप गाईच्या दुधात पाव कप पाणी व ७-८ वावडिंगाचे दाणे टाकून मंद आचेवर उकळावे.

पाणी उडून गेल्यावर संतुलन चैतन्य कल्पासारखा आयुर्वेदिक कल्प टाकून तयार केलेले दूध त्याला प्यायला द्यावे, ते आरोग्याकरता व पोट साफ होण्याकरता उत्तम असते. मुलाचे वय पाहता त्याला भाताचे पाणी, डाळीचे पाणी, भाज्यांचे सूप वगैरे सुरू केलेले असल्यास त्यात घरी बनविलेले गाईचे साजूक तूप आवर्जून घालावे किंवा संतुलन संतुलन तूप घालणे अधिक उत्तम.

दिवसातून १-२ वेळा त्याच्या पोटावर संतुलन रोझ ब्युटी तेल हलक्या हाताने नक्की लावावे, यामुळे गॅसेस कमी व्हायला व पोट साफ व्हायलाही मदत मिळेल. दिवसातून २-३ वेळा त्याच्या नाभीवर व गुदभागी एरंडेल तेल लावण्याचाही उपयोग होईल.

जलसंतुलन घालून, उकळून संस्कारित केलेले पाणी प्यायला द्यावे. शक्य झाल्यास १०-१२ काळ्या मनुका पाण्यात १-२ तास भिजवाव्या, नंतर कुस्करून घेऊन पाणी गाळून घ्यावे. असे पाणी त्याला प्यायला देण्याचाही फायदा होईल. पचनाला मदत हेण्याच्या दृष्टीने संतुलन बाल हर्बल सिरप तसेच सॅन अग्नी सिरप देण्याचा फायदा होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com