प्रश्नोत्तरे

मी दर शुक्रवारी फॅमिली डॉक्टर नियमाने वाचते. तसेच साम संजीवनी हा कार्यक्रम दर बुधवारी पाहते. मला या दोन्हा गोष्टी फार आवडतात.
food
foodsakal

मी दर शुक्रवारी फॅमिली डॉक्टर नियमाने वाचते. तसेच साम संजीवनी हा कार्यक्रम दर बुधवारी पाहते. मला या दोन्हा गोष्टी फार आवडतात. माझे वय ३२ वर्षे आहे. डॉक्टरांनी मला पीसीओडी असल्याचे सांगितले आहे. गेली १४ वर्षे आम्ही गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण अजून काही उपयोग झालेला नाही. आयव्हीएफ व आयआय दोन्हीकरून झाले आहे. याकरिता काय करता येईल याचे मार्गदर्शन करावे...

- सौ. संगीता, नवी मुंबई

उत्तर - नियमित पाळी येणे व ओव्ह्यूलेशन होणे हे स्त्रीसंतुलनाचे द्योतक असते. पाळी व्यवस्थित असली तर गर्भधारणा होणे व गर्भाची वाढ व्यवस्थित होणे शक्य असते. याकरिता सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संतुलन पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी करून गरजेनुसार औषधोपचार करावा. गरजेनुसार उत्तरबस्ती हा उपचार करूनही घेता येतो. त्याच बरोबरीने संतुलन फेमिनाईन बॅलन्स आसव, संतुलन अशोकादी घृत घेणे तसेच फेमिसॅन तेलाचा पिचू योनीभागी रोज ठेवणे उत्तम ठरेल. स्त्रीसुतंलनाकरिता श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे स्त्रीसंतुलन हे स्वास्थ्यसंगीत रोज ऐकणे श्रेयस्कर. लग्नाला १४ वर्षे झाली असली तर वय कमी असल्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही.

माझे वय ३५ वर्षे आहे. मी आयटी क्षेत्रात काम करते. सतत स्क्रीनचा वापर केल्यामुळे सध्या डोळ्यांमध्ये फार कोरडेपणा आलेला आहे, डोके दुखते, कशातही मन लागत नाही. सॅन अंजन वापरले की तात्पुरते बरे वाटते. यावर काही करता येईल का?

- श्रीमती प्रधान, कोल्हापूर

उत्तर - डोळ्यांच्या आरोग्याकरिता कुठल्याही स्क्रीनचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढे चांगले. कामाची वेळ सोडून स्क्रीनचा वापर टाळावा. डोळ्यांत सॅन अंजन (क्लिअर) घालणे उत्तम आहेच, पण रोज डोळ्यांमध्ये संतुलन सुनयन तेलासारखे एखादे तेल एक एक थेंब घालावे. तसेच सकाळी अनाशेपोटी एक चमचा संतुलन सुनयन तूप घेणेही उत्तम. रोज रात्री झोपताना संतुलन पादाभ्यंग घृताने तळपायांना काशाच्या वाटीने पादाभ्यंग करणेही उत्तम ठरेल. पंचकर्म करून घेतल्यावर नेत्रबस्ती हा उपचार करून घेतल्याचा अनेकांना फायदा झाल्याचे दिसते. प्रकृतीनुरूप संतुलन पंचकर्म करून त्यानंतर नेत्रबस्ती करून घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com