esakal | प्रश्नोत्तरे | Family Doctor
sakal

बोलून बातमी शोधा

Hair

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आमचे लग्न होऊन चार वर्षे झाली. गर्भधारणा होत नाही म्हणून वैद्यकीय सल्ला घेतला, त्यात माझा स्पर्म काउंट कमी असल्याचे समजले. आयुर्वेदीय गर्भसंस्कार पुस्तकानुसार आम्ही दोघांना पंचामृत घेण्यास सुरुवात केली आहे. कृपया अजून काय करायला हवे हे सुचवावे.

- श्री. महेश

उत्तर : पंचामृत घेणे उत्तम आहे. याशिवाय चैतन्य कल्प घालून दूध घेणे, मॅरोसॅन, च्यवनप्राशसारखे रसायन घेणे हे सुद्धा चांगले. स्पर्म काउंट वाढण्यासाठी शास्त्रशुद्ध पंचकर्म करून मग आयुर्वेदिक औषधे, रसायने घेण्याचा उत्तम परिणाम होताना दिसतो. यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम होय. पंचामृतामध्ये अमृतशर्करा घेण्याने, रोज सकाळी रात्रभर पाण्यात भिजविलेले ४-५ बदाम घेण्यानेही शुक्रपोषण होऊन अशा केसेसमध्ये उत्तम फायदा होताना दिसतो. नियमित सूर्यनमस्कार घालणे, चालायला जाणे, नियमित अभ्यंग करणे हेसुद्धा श्रेयस्कर.

माझा मुलगा १० वर्षांचा आहे. त्याचे १-२ केस पांढरे झालेले दिसतात. यावर आयुर्वेदात काही उपाय आहे का ?

- श्री. अविनाश नकाशे

उत्तर : शास्त्रशुद्ध आयुर्वेदाचे उपचार केले, खाण्यापिण्याचे पथ्य सांभाळले तर या वयात अशा तक्रारींवर अप्रतिम उपयोग झाल्याचा आजवरचा अनुभव आहे. एक दिवसाआड संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल केसांच्या मुळाशी जिरवून लावावे. सकाळ-संध्याकाळ १-१ हेअरसॅन गोळी घेणे तसेच अर्धा अर्धा चमचा सॅन रोझ घेणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा, अर्धा चमचा तूप व पाव चमचा मध हे मिश्रण घेणेही केसांच्या तक्रारींवर गुणकारी असते. आहारात वरून कच्चे मीठ घेणे, फळे व दूध एकत्र करून घेणे, चीज, पिझ्झा, अंडी, मैद्याचे बिस्कीट, ब्रेड, खारी वगैरे टाळणे आवश्यक.

loading image
go to top