प्रश्नोत्तरे

मी पाच महिन्यांची गर्भवती आहे. गर्भधारणेपूर्वी मला व्यवस्थित शांत झोप लागत असे. सध्या खूप विचित्र स्वप्ने पडतात. कधीतरी मी किंचाळून जागी होते.
pregnant women
pregnant womensakal
Summary

मी पाच महिन्यांची गर्भवती आहे. गर्भधारणेपूर्वी मला व्यवस्थित शांत झोप लागत असे. सध्या खूप विचित्र स्वप्ने पडतात. कधीतरी मी किंचाळून जागी होते.

मी पाच महिन्यांची गर्भवती आहे. गर्भधारणेपूर्वी मला व्यवस्थित शांत झोप लागत असे. सध्या खूप विचित्र स्वप्ने पडतात. कधीतरी मी किंचाळून जागी होते. माझ्या पहिल्या गर्भधारणेच्या वेळीही मला असाच अनुभव होता. माझा पहिला मुलगा पाच वर्षांचा आहे आणि त्याला मानसिक आजार असल्याचे आढळून आलेले आहे.

याही बाळाला अशा प्रकारचा कुठला आजार होईल का, अशी मनात भीती वाटते आहे. माझ्या सासूबाईंनाही मानसिक आजार आहे. स्वप्ने पडू नयेत, शांत झोप लागावी आणि येणाऱ्या बाळाचे आरोग्य नीट असावे, यासाठी काही उपाय सुचवता येईल का?

- सौ. मोघे, पुणे

उत्तर - गरोदरपणात कुठलाही चुकीचा बदल घडून आला तर त्याकरिता निश्र्चित उपाय करावेत. मला आशा आहे की, तुम्ही श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे गर्भसंस्कार संगीत रोज ऐकत असाल. याचबरोबर रात्री झोपण्याआधी श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या आवाजातील रामरक्षा ऐकली तर फायदा मिळू शकेल.

रात्री अंथरुणावर पडून योगनिद्रा संगीत लूपवर ठेवून ऐकत ऐकत झोपण्यास शांत झोप यायला आणि रिलॅक्स व्हायला मदत मिळू शकेल. संध्याकाळी वा रात्री झोपण्यापूर्वी संतुलन पादाभ्यंग घृत लावून तळपायांना १०-१० मिनिटे पादाभ्यंग करवून घेतलेले चांगले.

रात्री झोपण्यापूर्वी संतुलन ब्रह्मलीन तेलाचे ३-४ थेंब टाळूवर चोळण्याचा तसेच नाकात १-२ थेंब नस्यसॅन घृत टाकण्याचा फायदा होऊ शकेल. संतुलन सॅन रिलॅक्स सिरप घेण्याचाही फायदा होऊ शकेल. घरात वादविवाद, भांडण टाळण्याचा प्रयत्न करावा.

कुठलाही ताण असला तर मित्र-मैत्रिणींशी वा घरातील सदस्यांशी बोलून कसा कमी करता येईल, हे पाहावे. रोजच्या कामाबरोबर काही छंद जोपासल्यास फायदा होऊ शकेल. शक्य असल्यास घरात संतुलन प्युरिफायर धूप किंवा संतुलन परिवार कवच धूप करण्याचा फायदा होऊ शकेल.

माझी मुलगी सात महिन्यांची आहे. मी तिला आजपर्यंत कुठलेही औषध दिले नाही. नुकतीच मला ‘संतुलन’च्या उत्पादनांची माहिती मिळाली आहे. तिला आता बालामृत आणि बाळगुटी दिली तर चालेल का? तसेच तिला पंचामृत कधीपासून सुरू करावे? या सगळ्यांचे फायदे काय असतात?

उत्तर - आयुर्वेदात नवजात शिशूंची प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहावी, त्यांचे शारीरिक बल व्यवस्थित राहावे आणि त्यांच्या मेंदूचा विकास व्यवस्थित व्हावा यासाठी विविध रसायनांची योजना केलेली दिसते. त्याप्रमाणे संतुलन बालामृत आणि संतुलन बाळगुटी मुलांना देणे उत्तम असते.

आपल्या मुलीला संतुलन बालामृत लगेच सुरू करावे आणि ते वयाच्या पाच वर्षांपर्यंत देणे चांगले. बाळगुटी आता सुरू करून वयाच्या पंधराव्या महिन्यांपर्यंत देणे उत्तम. बाळाला बाहेरचे अन्न सुरू केल्यावर संतुलन बाल हर्बल सिरप देण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो.

बाहेरचे दूध देताना त्यात संतुलन चैतन्य कल्प घालून दिल्यास बाळाच्या एकंदर वाढीसाठी मदत करू शकेल. मुलीला पंचामृत द्यायला हरकत नाही, पण आता पूर्ण डोस न देता १-२ चमचे या मात्रेत देणे सुरू करावे, वयाच्या दोन वर्षांपासून पूर्ण मात्रेत द्यायला हरकत नाही.

मुलीला पंचामृत आवडत असल्यास दोन वर्षांच्या आधीही पूर्ण डोस द्यायला हरकत नाही. संतुलन बालामृत आणि संतुलन अमृशर्करायुक्त पंचामृत यांच्या अधिक माहितीकरिता डॉ. मालविका तांबे यांच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com