प्रश्नोत्तरे

माझे वय २८ वर्षे आहे. माझ्या मणक्यातील अंतर कमी झाल्यामुळे व तेथील नस दाबली गेल्यामुळे मान व डोके दुखते तसचे कुठलेही काम करताना अवघडल्यासारखे होते.
Headache
Headachesakal
Summary

माझे वय २८ वर्षे आहे. माझ्या मणक्यातील अंतर कमी झाल्यामुळे व तेथील नस दाबली गेल्यामुळे मान व डोके दुखते तसचे कुठलेही काम करताना अवघडल्यासारखे होते.

माझे वय २८ वर्षे आहे. माझ्या मणक्यातील अंतर कमी झाल्यामुळे व तेथील नस दाबली गेल्यामुळे मान व डोके दुखते तसचे कुठलेही काम करताना अवघडल्यासारखे होते. यावर काय उपाय करता येऊ शकेल? आम्ही लवकरच बाळाकरताही प्रयत्न करणार आहोत. त्याकरताही मार्गदर्शन करावे.

- ऊर्जी पातुरकर, लंडन

उत्तर - सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे अनेकांना कमी वयात वेगवेगळे त्रास होताना दिसतात. संगणकावर काय करताना पोश्चर चुकल्यामुळे मणक्यांचे त्रास उद्भवताना दिसतात. मणक्यातील अंतर कमी होणे, त्यातील गादी सरकणे, नसेवर दाब येणे हे सगळे त्रास वातदोषाशी निगडित असतात. व्यायामाच्या अभावामुळे तेथे असलेले स्नायू कमकुवत झालेले असतात. संपूर्ण अंगाला किंवा कमीत कमी पाठीला तरी तेल नक्की लावावे. संपूर्ण अंगाला संतुलन अभ्यंग सेससी सिद्ध तेल आठवड्यातून २-३ वेळा तसेच रोज रात्री झोपताना पाठीवर खालूवन वर हलक्या हाताने संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल नक्की लावावे.

ज्या ठिकाणी जास्त दुखत असेल तेथे संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल हलक्या हाताने जिरवणे उत्तम. संतुलन प्रशांत चूर्ण दूध-साखरेबरोबर घेतलेले चांगले. वातशमनासाठी संतुलन वातबल गोळ्या घेतलेल्या चांगल्या. खारीक पूड घालून उकळलेले दूध, घरचे साजूक तूप, डिंकाचे लाडू, नाचणीची भाकरी वगैरेंचे समावेश असावा. कमकुवतपणा कमी करण्याच्या दृष्टीने संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करवून घेणे उत्तम. यात शरीरशुद्धीनंतर नसा, अस्थी, स्नायू वगैरेंना ताकद मिळण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपचार करता येऊ शकतात. यानंतर SAFE करता रजिस्टर करून पुढचे मार्गदर्शन घेता येऊ शकते.

माझी आई ६५ वर्षांची आहे. बरीच वर्षे तिच्या पायांची आग आग होते, पायाच्या खाली कुणी धग ठेवली आहे असे तिला वाटते. तिच्या अंगात रक्त कमी असून तिला सतत थकवा जाणवतो. ती दिवसभर काम करते. काय करता येईल ते सुचवावे.

- आनंद तोमर, नवी मुंबई

उत्तर - वय वाढते तसे तसे शरीरामध्ये रक्ताभिसरण कमी व्हायला लागते. पायांकडे, तळपायांकडे रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे तळपायांची जळजळ होते किंवा पायात गोळे आल्यासारखे जाणवते. शरीरात रक्तधातू कमी असेल तर असे त्रास कमी वयातही होताना दिसतात. रक्ताभिसरणाला मदत होण्याच्या दृष्टीने संपूर्ण शरीराला अभ्यंग करावा तसेच तळपायांना पादाभ्यंग घृत लावून पादाभ्यंग करणे चांगले. रक्तधातू संपन्न असणे स्त्रीआरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी आहारात डाळिंब, सफरचंद, हिरव्या पालेभाज्या, मनुका, अंजीर यांचा समावेश असणे तसेच संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत घेणे उत्तम. रोज सकाळ- संध्याकाळ स्त्रीसंतुलन कल्प घालून दूध घेणे योग्य.

स्वयंपाक करत असताना शक्यतो लोखंडी कढई, पळी, तवा यांचा वापर करणे उत्तम. प्रत्येक पाककृतीला लोखंडी भांडे चालत नाही, परंतु रोजच्या पोळ्या तरी लोखंडाच्या तव्यावर कराव्या. सध्या नॉनस्टिकचा वापर जास्त होत असल्यामुळे स्त्री व पुरुष दोघांमध्ये रक्त कमी झाल्याचे आढळते. रोज धात्री रसायन, सॅन रोझ असे एखादे रसायन तसेच लोहित प्लस वगैरे रसायने व औषधे घेतल्याचा फायदा दिसू शकेल. जमत असल्यास बी १२, डी ३ या व्हिटॅमिन्सची तपासणी करून घ्यावी, तशी कुठली कमतरता असल्यास त्यानुसार औषधयोदना करणे सोपे पडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com