लहान मुलांसाठी बनवा पौष्टीक राळ्याचे चीजी मोदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लहान मुलांसाठी बनवा पौष्टीक राळ्याचे चीजी मोदक

लहान मुलांसाठी बनवा पौष्टीक राळ्याचे चीजी मोदक

लहान मुलांना पौष्टीक अन्न खाऊ घालणे ही पालकांसाठी मोठी कसरतचं असते. मुलांना कोणतेही पौष्टीक पदार्थ दिला तर ते सहजा सहजी ते खात नाही, त्यामुळे पालकांना काहींना काही हटके पदार्थ बनवून पौष्टीक पदार्थ खाऊ घालतात. सध्या गणेशोत्सवात लाडक्या बाप्पासाठी आपण उकडीचे किंवा तळणीचे मोदक बनवितो, लहान मुलांनाही ते आवडतात. मोदक म्हंटल की मुल ते आनंदाने खातात. आज आशाच एका पोष्टीक पण हटके मोदकांची रेसीपी तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्हाला माहित असेल की गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा सारखे पदार्थ खूप पौष्टीक असतात पण मुलांना हे पदार्थ खाऊ घालणे तसे अवघडच. आज आम्ही तुम्हाला राळ्याचे ( foxtail millet ) चविष्ठ चिजी मोदक कसे बनवावे हे सांगणार आहोत. हे मोदक तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील आणि मुलांना काहीतरी पौष्टीक खाऊ घातल्याचे समाधानही मिळेल.

हेही वाचा: Video: 'जीने के हैं चार दिन' भाईजानचा तुर्कीमध्ये डान्स

राळ्याचे चविष्ठ चिजी मोदक ( FOXTAIL MILLET CHEESY MODAK)

साहित्य : (12 मोदकांसाठी) (makes 12 modaks):

मोदकाच्या बाहेरील आवरणासाठी

 • अर्धा कप राळा (foxtail millet) (रात्रभर 6-8 तास भिजवलेले)

 • अर्धाकप पाणी उकळण्यासाठी

 • 1 टीस्पून ऑलिव्ह ऑईल

 • 1 टीस्पून रेड चिली फ्लेक्स

 • चवीपुरत खडे मीठ

सारणासाठी

 • अर्धाकप चिरलेली शिमला मिर्ची

 • पाव कप किसलेले चीज

 • 6-8 चेरी टोमॅटो

 • 1 टीस्पून इटालियन मसाला

हेही वाचा: स्वादिष्ट मोदक खायचे, मग 'या' आहेत रेसिपीज्

राळा स्वच्छ धूवून आणि 6-8 तास भिजवून ठेवा

 1. एका खोलगट पॅनमध्ये पाणी उकलण्यासाठी ठेवा. त्यामध्ये 1 टीस्पून ऑलिव्ह ऑईल आणि राळ्याचे धान्य घाला. झाकण ठेवा आणि सर्व पाणी आटेपर्यंत उकळू द्या

 2. मऊ होईपर्यंत शिजू द्या आणि थंड होण्यास ठेवा. त्यामध्ये मीठ आणि रेड चिली फ्लेक्स अॅड करा. कणकेसारखे एकजीव होईपर्यंत एकत्र करा.

 3. आता सारण बनविण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करून बाजूला ठेवून द्या,

 4. आता मोदक बनवायला घ्या. तुम्हाला मोदक बनिवण्याचे पात्र लागेल. तुमच्याकडे भांडे नसेल तर सर्व मिश्रण 12 एकसमान वाटणी करून लिंबाच्या अकाराचे गोळे तयार करा

 5. तुमच्या हाताला तेल लावून गोळ्याला पूरीचा आकार द्या. कडेचा भाग पातळ होईल याची काळजी घ्या. आता अंगठ्याचा आणि बोटांचा वापर करुन सारण भरून मोदकाला घड्या घाला. मोदकाच्या मधोमध हे चीजी सारण येईल याची काळजी घ्या. तयार झालेले मोदक बाजूला ठेवा

 6. गॅसवर उकळेल्या पाण्यावर चाळण ठेवून वाफेवर मोदक शिजविण्यासाठी 5-7 मिनिटांसाठी ठेवा.

 7. टोमॅटो सालसा किंवा डिप करून खाता येईल आशा पदार्थासोबत गरमा गरम मोदक खाण्यासाठी सर्व्ह करा.

राळ्याचे आरोग्यासाठी फायदे

राळ्याचे पदार्थांचा अन्नामध्ये समावेश केल्यास हाडे मजबूत होतात, मज्जासंस्था मजबूत करतात, रोजप्रतिकार शक्ती वाढते आणि पचशक्तीही सुधारते. ग्लासेमिक नियंत्रणासाठी हे फायदेशी ठरते आणि मधूमेहाच्या रुग्णांचे कोलेस्ट्रॉल, ग्लुकोज आणि इन्स्युलिन कमी करण्यास मदत करते.

(शालिनी रजनी या (बाजरी) मिलेट कोच आहेत. क्रेझी कडची मिलेटेट कोच या पेजचे संस्थापक असून सर्व वयोगटातील लोकांसाठई मिलेट पदार्थ बनविण्यासाठी वर्कशॉप घेतात

Shalini Rajani is a millet coach, the founder of Crazy Kadchi, and holds innovative Millets Cooking Workshops for all age groups.)

Web Title: A Savoury Foxtail Millet Cheesy Modak For Your Little One

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..