Video: 'जीने के हैं चार दिन' भाईजानचा तुर्कीमध्ये डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video: 'जीने के हैं चार दिन' भाईजानचा तुर्कीमध्ये डान्स

Video: 'जीने के हैं चार दिन' भाईजानचा तुर्कीमध्ये डान्स

मुंबई - बॉलीवूड अभिनेता सलमान खान (salman khan) हा त्याच्या टायगर 3च्या चित्रिकरणात व्यस्त होता. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये भाईजाननं त्याच्याच एका चित्रपटातील गाण्यावर डान्स केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या अंदाजासाठी सलमान हा नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या येणाऱ्या नव्या चित्रपटाची किंवा त्याच्या नव्या रिलेशनशिपची चर्चा ही नेहमीच सुरु असते. मात्र सलमाननं अद्याप कोणत्याही रिलेशनशिपविषयी जाहीर खुलासा केलेला नाही. तो लग्न कधी करणार हा तर बॉलीवू़डबरोबर त्याच्या लाखो चाहत्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे. सध्या त्याच्या टायगरच्या तिसऱ्या भागाची चर्चा रंगली आहे. ज्यात तो कॅटरिना कैफसोबत (katrina kaif)दिसणार आहे.

सलमान आणि कॅटरिनाच्या रिलेशनशिपची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा आहे. कॅटरिनानं बूम या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तिच्या आणि सलमानच्या नावाची जोरदार चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून विकी कौशल आणि कॅटरिनाचा साखरपूडा झाला ही बातमीही समोर आली होती. मात्र त्याला त्या दोघांपैकी कुणीही अधिकृतरित्या संमती दिलेली नाही. त्यामुळे अजूनही त्यांचं नातं हे गुलदस्त्यातच आहे. सलमान आणि कॅटरिना सध्या टायगरच्या तिसऱ्या भागाच्या शुटिंगमध्य़े व्यस्त आहे. या चित्रपटाचे शुटींग तुर्कीमध्ये सुरु आहे. त्यावेळी सलमान आणि कॅटरिना हे दोघे तेथील मोठ्या नेत्यांना भेटले. त्या पार्टीतील एका व्हिडिओला सलमानचा डान्स व्हायरल झाला आहे. सलमाननं मुझसे शादी करोगी चित्रपटातील जीने के है चार दिन गाण्यावर डान्स केला आहे.

त्या गाण्याचा व्हि़डिओ हा सलमानच्या इंस्टावर शेयर करण्यात आला आहे. तो व्हिडिओ तुर्कीमधला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमानच्या चाहत्यांना त्याच्या टायगर 3 चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानचा राधे द मोस्ट वाँटेड भाईजान नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. येत्या दिवसांत सलमानचा अंतिम द फायनल ट्रुथ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहे.

हेही वाचा: 'सेलमॉन भॉई' मोबाइल गेमविरोधात सलमान खान कोर्टात

हेही वाचा: सलमान आणि आयुषचं ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’: पोस्टर व्हायरल

Web Title: Bollywood Actor Salman Khan Dance In Turkey Viral On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..