अनंत अंबानींना आवडतो हेल्दी हिरवा हरभरा डोसा; जाणून घ्या रेसिपी

पेसरट्टू हा अनंत अंबानी यांच्या आवडीचा पदार्थ आहे. हा आंध्र प्रदेशचा लोकप्रिय पदार्थ आहे.
Anant Ambani Loves to Eat Andhra Pesarattu Know More About This Healthy Green Gram Dosa and Its Recipe
Anant Ambani Loves to Eat Andhra Pesarattu Know More About This Healthy Green Gram Dosa and Its Recipe
Updated on

अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे लग्नापूर्वीच्या ग्रँड सोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लग्नाबद्दल काहीच न सांगता अनंत यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच मार्चमध्ये जामनगर येथे प्री-वेडिंग पार्टी ठेवण्यात आली होती. याचदरम्यान अनंत अंबानी यांच्या आवडीच्या पदार्थाचा खुलासा झाला. पेसरट्टू हा त्यांचा आवडीचा पदार्थ आहे. हे नाव ऐकल्यावर तुम्ही बुचकळ्यात पडला असाल. तर हा पदार्थ आंध्र प्रदेशचा आहे. आपल्याइकडे याला हिरवा हरभरा डोसा असं म्हणतात.

Anant Ambani Loves to Eat Andhra Pesarattu Know More About This Healthy Green Gram Dosa and Its Recipe
हिटमॅनला पाहून नीता अंबानी भावूक, मिठी मारून लागल्या रडू; मुलाच्या संगीत सोहळ्यातील Video Viral

तर त्यानिमित्त जाणून घेऊयात हरभरा डोसा रेसिपी

हरभरा डोसा हा खुप हेल्दी आहे. सेवनाने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. १०० ग्रॅम चणे खाल्ल्याने १९ ग्रॅम प्रोटीन शरीराला मिळते.

डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक कप संपूर्ण हिरवा मूग

1/4 कप कच्चा तांदूळ

आल्याचा एक छोटा तुकडा

कोथिंबीर

2 लसूण पाकळ्या

1-2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार

तेल

1/4 कप चिरलेला कांदा

Anant Ambani Loves to Eat Andhra Pesarattu Know More About This Healthy Green Gram Dosa and Its Recipe
Breakfast Recipe : साध्या पोह्यांपेक्षा इंदोरी पोहे कसे वेगळे? जाणून घ्या चटपटीत पोह्यांची सोप्पी रेसिपी

कृती

संपूर्ण हिरवा मूग आणि तांदूळ किमान ४ तास किंवा शक्य असल्यास रात्रभर भिजत ठेवा. भिजवलेली मूग डाळ, तांदूळ, आले, कोथिंबीर, लसूण हिरवी मिरची, मीठ आणि पाणी बारीक करून घ्या. डोसा बनवता येईत इतपत त्यामध्ये पाणी घाला. पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

तवा चांगला गरम करा. मग हे बॅटर पळीच्या साहय्याने तव्यावर पसरवा. डोस्यावर थोडे तेल टाका आणि हवे असल्यास वर चिरलेला कांदा पसरवा. दोन्ही बाजूने डोसा भाजल्यानंतर गरमागरम सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.