Ants Prevention: मुंग्यांमुळे हैराण आहात? मग हे घरगुती उपाय करा आणि मुंग्या पळवा

Ants Prevention Tips: मुंगी ही दिसायला अगदी लहान असली तरी घरात मुंगी दिसली की मोठं टेन्शन येतं. घरातल्या मुंग्यांचा वावर हा मोठा त्रासदायक असतो. बऱ्याचदा मुंग्याचं वास्तव हे स्वयंपाक घरात जास्त असल्याचं दिसून येतं. या मुंग्या कशा पळवायच्या याच्या काही टिप्स....
Ants Prevention Tips
Ants Prevention TipsEsakal

Ants Prevention Tips: मुंगी ही दिसायला अगदी लहान असली तरी घरात मुंगी दिसली की मोठं टेन्शन येतं. घरातल्या मुंग्यांचा वावर हा मोठा त्रासदायक असतो. बऱ्याचदा मुंग्याचं वास्तव हे स्वयंपाक घरात जास्त असल्याचं दिसून येत.

कारण साखर, गूळ हे गोड पदार्थ मुंग्याच्या खास आवडीचे असतात. पण केवळ गोडचं नव्हे तर अनेत मुंग्या या खोबरं, शेंगदाणे, धान्य या सगळ्या गोष्टींचा खाऊन पार भुगा करतात. अनेकदा शिजलेल्या पदार्थांवरही त्या घाला करतात. मग तो भात असो वा चपाती मुंग्या कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होतील याचा नेम नाही. Ant Prevention Tips How to get rid of ants in the home

मुंग्यांचे वेगवेगळे प्रकार आढळतात. लाल आणि काळा अशा दोन रंगात त्या असून त्यांचे आकारही वेगवेगळे असता. काही लाल मुंग्या चावल्यावर लगेचच सूज येऊन जळजळ होते ही जळजळ खूप जास्त काळ राहते.

तसचं काही मोठ्या काळ्या मुंग्या अनेक ठिकाणी यांना डोंगळेही म्हणतात या मुंग्यांचा डंकही वेदनादायी Painful असतो. खास करून घरात लहान मुलं असली की मुंग्यांची समस्या मोठी सतावते.

सध्या बाजारात मुंग्या पळवण्यासाठी अनेक औषधं Medicines उपलब्ध आहेत. यात काही स्प्रे, पावडर तसंच खडू उपलब्ध असतात. यातील बऱ्याच औषधांमध्ये केमिकल्स असल्याने ते स्वयंपाक घरात वापरणं किंवा लहान मुलांच्या संपर्कात आल्याने धोकादायक ठरू शकतं.

अशात तर घरातीलच काही पदार्थांचा वापर करून मुंग्या पळवता आल्या तर? होय आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करून मुंग्यांपासून सुटका मिळू शकते. ते कसं हे आम्ही तुम्हाला सांगतो. Get rid from ants at home

घरात उपलब्ध असलेल्या काळी मिरी, दालचिनी, मीठ, विनेगर, संत्र्याचं साल, कॉफी तसचं नैसर्गिक असं निलगिरी आणि कडूलिंबाच्या तेलाचा वापर मुंग्या पळवण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी करणं शक्य आहे. Ant Prevention Tips कशा प्रकारे या वस्तूंचा वापर करावा हे पाहुयात

हे देखिल वाचा -

Ants Prevention Tips
घरात पाली झाल्यात; हे घरगुती उपाय करा
  1. काळीमिरी- काळीमिरीच्या वासाने आपल्यालाही शिंका येऊ शकतात. तसाच मुंग्यांनादेखील काळ्या मिरीचा स्ट्रॉन्ग वास आवडत नाही. त्यामुळे या वासाने त्या पळ काढतात. त्यामुळेच काळ्या मुंग्याना पळवण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी त्या येऊ नये यासाठी काळ्यामिरीची पुड त्या ठिकाणी टाकल्यास मुंग्या गायब होतील. तुम्हाला मुंग्या येण्याचं ठिकाण सापडल्यास त्या ठिकाणीदेखील तुम्ही मिरीपूड टाकू शकता. त्याचप्रमाणे घरातील भिंतींच्या कोपऱ्यांमध्ये किंवा ओट्याखाली मुंग्या येत असतील तर तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि मिरीपूट टाकून एक मिश्रण तयार करू शकता. हा स्प्रे तुम्ही किचनमध्ये मारल्यास मुंग्यांचं प्रमाण कमी होईल.

  2. संत्र्याची साल-  संत्र्याच्या सालीचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. मात्र हिच संत्र्याची साल घरातील मुंग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. संत्र्याच्या सालीतही मोठ्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड असतं लाल मुंग्यांसाठी हे एका प्रकारचं विष आहे. त्यामुळेच एखाद्या गोड पदार्थाला मुंग्या लागू नये अशी तुमची इच्छा असेल तर त्याशेजारी तुम्ही संत्र्याच्या काही साली ठेवू शकता. किंवा जेवणाच्या टेबलवरही तुम्ही संत्र्याच्या सालीची रचना करून ठेवू शकता. त्यामुळे मुंग्याही येणार नाही आणि संत्र्याची साल एअर फ्रेशनरचंही काम करेल. 

  3. लिंबू- संत्र्याप्रमाणेच लिंबातही सायट्रिक ऍसिडचं मोठं प्रमाण असतं. लिंबाचा स्ट्राँग वास आणि त्याची चव ही मुंग्याना पळवण्यासाठी मदत करू शकते. संत्र्याचा सिझन नसताना लिंबू तुम्हाला मुंग्या पळवण्यासाठी मदत करू शकतो. लिंबाचा रस पसरवून तुम्ही मुंग्यांना पळवू शकता. तसचं फरशी पुसण्याच्या पाण्यातही लिंबूचा रस मिसळल्यास घरात ताजा सुंगंध पसरेल शिवाय मुंग्याही नाहीशा होतील. 

4. कॉफी- कॉफीचा वासही खूप स्ट्राँग असतो. त्यामुळेच तुम्ही मुंग्या पळवण्यासाठी कॉफी पावडर वापरू शकता. काही वेळा मुंग्या या रोपांच्या मुळाशी देखील घर करता. अशावेळी देखील तुम्ही कॉफी पावडर वापरून मुंग्यांपासून सुटका मिळवू शकता. 

5. मीठ- ज्याशिवाय अन्न पूर्ण होवू शकत नाही ते म्हणजे मीठ. या मिठाचा वापर मुंग्याना मारण्यासाठी किंवा त्या पळवण्यासाठी होवू शकतो. एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंग्या दिसल्यास तुम्ही तिथे काहिसं मीठ टाकल्यास त्या मरुन जातील, तसचं मुंग्या येण्याचं ठिकाण दिसल्यास तिथे चिमुटभर मीठ टाकून ठेवाव.

अशाप्रकारे आपल्या घरातील स्वयंपाक घरातच सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून तुम्ही मुंग्याच्या समस्येची चिंता दूर करू शकता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com