
Quick Ashadhi Ekadashi Recipes: आषाढी एकादशी हा पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीचा आणि उपवासाचा पवित्र सण आहे. या निमित्ताने भक्त उपवास करतात आणि सात्त्विक पदार्थांचा आस्वाद घेतात. जर तुम्ही या एकादशीला काही खास आणि उपवासाला योग्य पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी आणली आहे एक सोपी आणि स्वादिष्ट पॅटिसची रेसिपी! हे पॅटिस उपवासाला खाऊ शकता. तसेच चवीने भरपूर आणि बनवायला अत्यंत सोपी आहे. साबुदाणा, राजगिरा किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेली ही पॅटिस तुमच्या उपवासाला रुचकर बनवेल. अगदी कमी वेळेत तुम्ही हे पॅटिस तयार करु शकता. ज आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचे पॅटिस बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.