Asame Style Poita Bhat Recipe : आदल्या दिवशीचा भात उरला आहे? मग त्यापासून बनवा आसामी स्टाईल पोईटा भात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asame Style Poita Bhat Recipe

Asame Style Poita Bhat Recipe : आदल्या दिवशीचा भात उरला आहे? मग त्यापासून बनवा आसामी स्टाईल पोईटा भात

Asame Style Poita Bhat Recipe : भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा पोईटा भात खूप प्रसिद्ध आहे. ही रेसिपी जुन्या काळापासून भारतातल्या विविध समुदायांनी त्यांची पारंपारिक रेसिपी म्हणून जपली आहे. उरलेला भात आंबण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो नाश्त्यामध्ये बनवला जातो.

हेही वाचा: Vangi Bhat Recipe: असा करा टेस्टी वांगी भात, एकदा खाल तर बोटे चाखाल

आसामी लोक याला पोईटा भात, बंगाली लोक पोनटा भात, ओडिसात पखाला, बिहारमध्ये गील भात, केरळमध्ये पझनकांजी आणि दक्षिण भारतात पलाया सदम किंवा पलायथु किंवा नीरागराम म्हणतात. पारंपारिकपणे आसामी पोईटा भात मॅश पोटेटो (आलू पिटीका) किंवा मॅश ग्रील्ड फिश (पुरा मसोर पिटीका) सोबत खाल्ला जातो.

हेही वाचा: Dhaba Style Recipe: कढ़ी  खायचे शौकीन आहात, ट्राई करा मग धाबा स्टाइल कढी पकोडा

साहित्य

पोईटा भातसाठी

• 1 वाटी भात 2 वाटी पाण्यात रात्रभर भिजत ठेवा

• 1/4 कप दही (दही / ताक), किंवा 1/2 कप ताक

• 2 चिरलेले कांदे

• 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

• चवीनुसार मीठ

हेही वाचा: Bra Style : अशी बदलत गेली 'ब्रा' ची फॅशन

आलू पिटिकासाठी

• 3 बटाटे

• 1/2 टीस्पून हळद

• १ टेबलस्पून मोहरीचे तेल

• २ हिरव्या मिरच्या

• मीठ, चवीनुसार

हेही वाचा: Styling Tips For Curvy Girl: छातीचा आकार कमी करायचा असेल तर या टिप्स करतील मदत

आलू पिटीका रेसिपीसह आसामी पोईटा भात कसा बनवायचा

1. आलू पिटिका रेसिपीसह आसामी पोईटा भात तयार करण्यासाठी, उरलेला भात 2 वाटी पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.

2. दुसऱ्या दिवशी सकाळी फेटलेले दही किंवा ताक घालून मिक्सिंग बाऊलमध्ये चांगले मिसळा. मीठ, चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला आणि बाजूला ठेवा.

3. आलू पिटिका तयार करण्यासाठी, बटाटे उकडून सोलून घ्या आणि चांगले मॅश करा.

हेही वाचा: Karwa Chauth 2021: अनुष्का शर्माचा Ethnic Style लूक करा फॉलो

4. कढईत मोहरीचे तेल गरम करा आणि तेल गरम झाल्यावर त्यात हळद घाला.

5. त्यात मॅश केलेले बटाटे मध्ये घाला आणि मिक्स करा.

6. चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला आणि पुन्हा मिक्स करा. आलू पिटिका तयार आहे.

7. आसामी पोईटा भाट आलू पिटिका रेसिपीसोबत नाश्त्यासाठी सर्व्ह करा