Vangi Bhat Recipe: असा करा टेस्टी वांगी भात, एकदा खाल तर बोटे चाखाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vangi bhat

Vangi Bhat Recipe: असा करा टेस्टी वांगी भात, एकदा खाल तर बोटे चाखाल

दररोज खाण्यात काहीतरी वेगळं असावं, असा प्रत्येकाचा अट्टहास असतो पण नेमकं काय करावं, हेच कळत नाही. भात म्हटले की आपण मसाले भात, दाल खिचडी किंवा पुलाव शिवाय काही वेगळं करत नाही मात्र आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत.

अनेकांना वांग्याची भाजी आवडते पण आज आम्ही तुम्हाला वांगी भात कसा करायचा, याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (food news: how to make vangi bhat recipe)

हेही वाचा: Food Recipe : बनवा पालक पनीर दम बिर्याणी फक्त ३५ मिनिटात

साहित्य -

 • दोन वाट्या तांदूळ,

 • दीड वाटी वांग्याच्या बारीक फोडी

 • पाव टीस्पून हळद,

 • दोन टीस्पून गोडा मसाला

 • अर्धा टीस्पून मिरची सूण लाल पावडर

 • एक टीस्पून धने-जिरे पावडर

 • एक यावर टीस्पून साखर

 • एक टीस्पून मीठ

 • अर्धे लिंबू, ओले खोबरे

 • कोथिंबीर

 • चार वाट्या गरम पाणी

 • दोन-तीन टेबलस्पून तेल

 • हिंग

 • मोहरी

 • जिरे

 • दोन तीन सुक्या मिरच्या

 • कढीपत्ता.

हेही वाचा: Food Recipe : बनवा पालक पनीर दम बिर्याणी फक्त ३५ मिनिटात

कृती -

 • सुरवातीला तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास चाळणीत निथळू द्यावा.

 • नंतर पातेल्यात तेल तापल्यावर फोडणीचे मसाले घालावेत व त्यावर तांदूळ घालून गुलाबी परतावा.

 • त्यानंतर नंतर त्यावर हळद, वांगी, तिखट, गोडा मसाला, धने-जिरे पावडर घालून थोडे परतावे

 • त्यात गरम पाणी, मीठ, साखर, लिंबूरस घालून ढवळावे

 • पाणी सुकल्यावर मंद गॅसवर वाफेवर भात शिजू द्यावा व सर्व्ह करताना वरून खोबरे, कोथिंबीर घालावी.

  - प्रतिभा कोठावले