how to make perfect sharbat
how to make perfect sharbatSakal

Cooking Tips: उन्हाळ्यात सरबत बनवताना 'या' चुका टाळा

how to make perfect sharbat: तुम्हाला परफेक्ट सरबत बनवायचे असेल तर पुढील चुका करू नका.

avoid these mistakes while making sharbat in summer

उन्हाच्या कडक झळा सुरू झाल्या आहेत. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ६ ते ७ लिटिर पाणी पिणे गरजेचे आहे. पण दिवसभरात एवढे पाणी पिणे शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही सरबतचे सेवन करू शकता. सरबत बनवणे सोपे आहे तरीसुद्धा अनेक लोक सामान्य चुका करतात. यामुळे सरबत करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

लिंबू, पुदिना अतिवापर

सरबतची चव वाढवण्यासाठी लिंबू, पुदिना आणि विलायचा वापर केला जातो. पण अनेक वेळा लोक याचा अतिवापर करतात. यामुळे सरबतची चव खराब होत. जेव्हाही तुम्ही सरबत बनवाल तेव्हा लिंबू, पुदिना योग्य प्रमाणात टाकावे.

साखरेचे योग्य प्रमाण नसणे

अनेकदा लोक साखर आणि पाण्याचे योग्य माप ठेवत नाही. त्यामुळे सरबतची चव खराब होते. साखर हा सरबतचा मुख्य घटक आहे. यामुळे गोडवा वाढतो. यामुळे योग्य माप घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात सरबत प्यायल्याने शरीर डायड्रेट राहते.

how to make perfect sharbat
Reishi Mushroom: कित्येक समस्यांवर गुणकारी आहे रेशी मशरूम; तणाव अन् निद्रानाशाची समस्या राहील दूर

सिरप

जर तुम्ही गुलाब, संत्रा यासारख्या फळांचे सिरप वापरून सरबत बनवत असाल तर त्याचे योग्य प्रमाण घ्यावे. तसेच पाण्याचे देखील योग्य प्रमाण घेणे देखील आवश्यक आहे. अन्यथा त्याची चव खराब होऊ शकते.

सर्व साहित्य नीट न मिक्स करणे

सरबत बनवताना सर्व साहित्य नीट मिक्स करणे गरजेचे असते. सरबतमध्ये सर्व साहित्य नीट मिक्स न झाल्यास चव खराब होऊ शकते. यामुळे साखर आणि पाणी नीट मिक्स होईपर्यंत ढवळत राहावे. यामुळे सरबतची चव द्विगुणित होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com