Badam Barfi Benefits : बदाम बर्फी खात इम्युनिटी वाढवा, आरोग्यासाठी फायद्याची, लगेच रेसिपी नोट करा

झटपट बदाम बर्फी बनवण्याची रेसिपी नोट करा
Badam Barfi Benefits
Badam Barfi Benefitsesakal

Badam Barfi Benefits : ड्रायफ्रूट हे शरीरासाठी पोषक असतात. त्यामध्ये फायबर, प्रोटीन, विटामिन ई, मॅग्नेशियम, मँगनिज, कॉपर, फॉस्फोरस यांसारखे पोषक तत्व भरभरून असतात. बदाम ही गरम असते त्यामुळे बदलत्या ऋतूनुसार त्याचे काळजीपूर्वक सेवन करावे.

बदामचे रोज सेवन केल्याने वजन कमी होते, हड्ड्या मजबूत होतात आणि हृदयरोग, कँसर आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. एवढेच नव्हे तर बदामच्या सेवनाने इम्युनिटी वाढते. तेव्हा आज आपण बदाम बर्फी बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया. शिवाय ही रेसिपी बनवायलाही फार सोपी आहे.

Badam Barfi Benefits
Breakfast Recipe : उरलेल्या चपात्या टाकू नका; नाश्त्याला 'ही' रेसिपी ट्राय करा, खाणारे बोटंच चाटत राहतील!

बदाम बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

250 ग्रॅम बदाम

1 कप दूध

1 चमचा तूप

2 चिमुट केशर

1 कप साखर (Recipe)

Badam Barfi Benefits
Halwa Recipe : रव्याच्या शिऱ्यापेक्षाही टेस्टी शिरा फक्त 15 मिनिटांत बनवा, नोट करा रेसिपी

बदाम बर्फी कशी बनवायची?

  • बदाम बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक पॅन घ्या.

  • नंतर त्यात पाणी घालून चांगले उकळावे. (Food News)

  • यानंतर तुम्ही त्यात बदाम टाका आणि काही काळ ठेवा.

  • नंतर बदाम बाहेर काढा आणि सुमारे 1-2 मिनिटे थंड पाण्यात ठेवा.

  • यानंतर बदामची सर्व साले काढा.

  • नंतर पुन्हा गरम पाण्यात बदाम टाका.

  • यानंतर त्यांना सुमारे 1 तास भिजत ठेवा.

  • नंतर ब्लेंडरमध्ये बदाम आणि दूध घालून चांगले बारीक करा.

  • यानंतर कढईत तूप टाकून गरम करा.

  • नंतर त्यात बदामची पेस्ट, केशर आणि साखर घालून मिक्स करा.

  • यानंतर, बदामची पेस्ट सतत ढवळत राहा.

  • आता गॅस बंद करा आणि पेस्ट थंड होण्यासाठी सोडा.

  • यानंतर, प्लेट/ट्रेच्या तळाला तुपाने चांगले ग्रीस करा.

  • नंतर पेस्ट थोडीशी कोमट झाली की, ती एका ट्रेमध्ये ठेवा आणि सारखी पसरवा. (Immunity booster)

  • यानंतर तुम्ही पेस्ट सेट करा.

  • नंतर सेट झाल्यावर बर्फी चाकूच्या साहाय्याने कापून घ्या.

  • आता तुमची चवदार बदाम बर्फी तयार आहे.

  • नंतर प्रत्येक तुकड्याच्या वर एक बदाम चिकटवा आणि सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com