Badshah Masala : कधी काळी सिगारटेच्या डब्ब्यात विकला जात होता प्रसिद्ध मसाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Badshah Masala

Badshah Masala : कधी काळी सिगारटेच्या डब्ब्यात विकला जात होता प्रसिद्ध मसाला

Badshah Masala History : भारतीय खाद्यपदार्थात वापरण्यात येणारे मसालेच जेवणाची चव अधिक स्वादिष्ट बनवतात. यासाठी स्वयंपाघरात तुम्हाला विविध प्रकारचे मसाले पाहण्यास मिळतील.

या सर्व मसाल्यांमध्ये बादशाह मसाल्याने स्वताची अशी एक वेगळी ओळक निर्माण केली आहे. मात्र, ज्यावेळी या मसाल्याची सुरूवात झाली होती. तेव्हा हा आतासारख्या पॅकिंगमध्ये विकला जात नव्हता. तर, तो सिगारेटच्या डब्ब्यात विकला जात होता. आज आम्ही तुम्हाला बादशाह स्पाइसेसचा इतिहास आणि त्याच्या यशाचा प्रवास सांगणार आहोत.

हेही वाचा: Spices : 'या' मसाले पदार्थांमुळे आरोग्याला होतात फायदे, पाहा कोणते?

1958 मध्ये सुरू झालेल्या हा मसाल्यावे जगभरात झपाट्याने प्रसिद्ध झाला. अगदी अलीकडेच डाबरने बादशाह मसाल्यामधील 51 टक्के हिस्सा 587.52 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.

सिगारेटच्या बॉक्समध्ये विकला जात होता मसाला

बादशाह मसाल्याची सुरूवात 1958 मध्ये जवाहरलाल जमनादास झवेरी यांनी सुरू केला. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात जवाहरलाल जमनादास सिगारेटचे बॉक्स मसाल्यांनी भरून सायकलवर विकायचे. पूर्वीच्या काळी सिगारेट टिनच्या डब्यात यायची.

हेही वाचा: Food recipes : घरच्या घरी बनवा मसाले भात, अगदी पंगतीत असतो तसाच...

जवाहरलाल जमनादास हे टिनचे डबे गोळा करायचे, स्वच्छ करायचे आणि नंतर त्यात मसाले भरूनते सायकलवरून विकायचे. कालांतराने हा मसाला सर्वांच्या पसंतीस उतरला आणि प्रसिद्ध झाला.

यानंतर जवाहरलाल जमनादास यांनी घाटकोपर येथे या मसाल्यांचे आणखी एक युनिट उघडले. काही कालावधीनंतर हे युनिट गुजरातमधील उंबरगा येथे 6 हजार चौरस फुटांच्या मोठ्या कारखान्यात रूपांतरित झाले. बाजारात दाखल झाल्यानंतर कंपनीने पावभाजी मसाला, चाट मसाला आणि चना मसाला आणला, ही चव लोकांना आवडल्याने प्रत्येक घराघरात पोहचला.

हेही वाचा: Winter Special Tea: थंडीच्या दिवसांत झटपट बनवा विंटर स्पेशल मसाला टी; मूड अन् माइंड होईल फ्रेश

आज बादशाह मसाला 20 हून अधिक देशांमध्ये निर्यात केला जातो. 450 वितरकांच्या नेटवर्कसह सुपरमार्केट, स्थानिक किराणा दुकाने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पोहोचला आहे.