
History Behind Black Forest Cake's Name
sakal
History, Origin and Meaning of Black Forest Cake: 'ब्लॅक फॉरेस्ट' केक हे जगप्रसिद्ध जर्मन डेझर्ट असून, तेथील 'ब्लॅक फॉरेस्ट' या पर्वतराशींवरून या केकला 'ब्लॅक फॉरेस्ट' हे नाव मिळाले आहे. या डेझर्टमध्ये मऊ व स्पॉजी चॉकलेट केकचे एकावर एक थर लावून त्या प्रत्येक थरामध्ये फेटलेली क्रीम व चेरीज घातल्या जातात. वरच्या थरावर पांढरी शुभ्र क्रीम पसरून त्यावर किसलेली चॉकलेट्स व लालचुटूक चेरी यांनी सजावट केली जाते.