चटपटीत चवीचा नाश्ता, 'कोबी पराठे'; वाचा सोपी रेसिपी

चटपटीत चवीचा नाश्ता, 'कोबी पराठे'; वाचा सोपी रेसिपी
Summary

घरीच उपलब्ध असलेल्या काही घटकांपासून ही रेसिपी तयार केली जाते. अनेक गृहीनींना ही रेसिपी बनवन्याच्या काही सोप्या ट्रीक्स माहित नसतात.

बटाटा, फ्लॉवर, पालकाचे पराठे सर्वांना आवडतात. भरपेट आपण कोणतेही काम करु शकतो. भरपेट नाश्ता करायचा असेल तर आपण या पदार्थांना पसंती देतो. शिवाय काही भागात पराठा शरीराची ताकद वाढवणारा महत्वाचा पदार्थ म्हणून आवडीने खाल्ला जातो. वेगवेगळ्या प्रकारे हे पराठे बनवले जातात. यात मुलांना आवडणारे आणि खास वेगळ्या चवीचे पराठे म्हणून कोबी पराठ्यांकडे पाहिले जाते. कमी वेळात झटपट तयार होणारी डिश घरातील सर्व सदस्य अगदी आनंदाने खातात. यासाठी कोणत्याही वेगळ्या साहित्याची गरज भासत नाही. घरीच उपलब्ध असलेल्या काही घटकांपासून ही रेसिपी तयार केली जाते. अनेक गृहीनींना ही रेसिपी बनवन्याच्या काही सोप्या ट्रीक्स माहित नसतात. त्यामुळे नाश्ताला आपल्याला तेच पदार्थ पहायला मिळतात. मात्र आज या खास आणि सोप्या रेसिपीबद्दल तुम्हांला माहिती सांगणार आहोत. त्यामुळे वाचणाऱ्या गृहीनींना आजच ही रेसिपी ट्राय करण्यास हरकत नाही.

चटपटीत चवीचा नाश्ता, 'कोबी पराठे'; वाचा सोपी रेसिपी
ज्युसरचा वापर न करता झटपट बनवा फळांचा ज्युस; वाचा रेसिपी

साहित्य -

  • गहू, नाचनी, ज्वारी, बेसन, तांदुळ पीठ - प्रत्येकी १ वाटी

  • किसलेला कोबी - ३ वाटी

  • मीठ - आवश्यकतेनुसार

  • हिंग, जिरे, गरम मसाला, ओवा - आवश्यकतेनुसार

  • तेल - आवश्यकतेनुसार

  • लाल तिखट - आवश्यकतेनुसार

  • बारिक चिरलेला कांदा - ३

  • बारिक चिरलेली मिरची - २

चटपटीत चवीचा नाश्ता, 'कोबी पराठे'; वाचा सोपी रेसिपी
डाइट, Exercise करुनही वजन कमी होत नाही? जाणून घ्या कारण

कृती -

सुरुवातीला किसनीच्या मदतीने कोबी बारिक किसून घ्यावा. एका बाजूला मोठे भांडे घेऊन त्यात गहू, नाचणी, ज्वारी, बेसन, तांदुळ अशी चार ते पाच किंवा अन्य कोणत्याही पीठांचा वापर करुन एकत्र करावे. यामध्ये किसलेला कोबी टाकावा. बारिक चिरलेला कांदा आणि मिरची टाकावी. या मिश्रणात आवश्यकतेनुसार मीठ, हिंग, जिरे, गरम मसाला, ओवा टाकावा. पाणी घालून हलकेच हे मिश्रण मळून घ्यावे. मळून झाल्यानंतर या पीठाला काही काळ भिजत ठेवावे. थोड्या वेळाने हे मिश्रणाचे बारीक गोळे करुन घ्यावेत. या गोळ्यांना आधी पोळपाटावर घेऊन पाण्याच्या हात लावत गोल पुरीप्रमाणे आकार द्यावा. कालांतराने याला लाटण्याच्या सहायाने गोलाकार आकार द्यावा. तयार करत असताना पराठा फुटणार नाही याची काळजी घ्यावी. दुसऱ्या बाजूला पॅन गरम करत ठेवा. तापल्यानंतर त्यात थोडे तेल टाकावे. त्यावर तयार पराठा भाजून घ्यावा. पराठा परतवून पुन्हा एकदा त्यावर तेल सोडावे आणि त्याची दुसरी बाजू भाजून घ्यावी. भाजताना गॅस मंद आचेवर ठेवावा. याप्रमाणे सर्व पराठे तयार करुन भाजून घ्यावेत. हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, की भाजत असताना तेलाचा वापर अगदी कमी करावा. तयार पराठे सॉस किंवा दही सोबत सर्व्ह करावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com