Carrot Salad : थंडीत उपयुक्त अशी आजी स्टाईल टेस्टी गाजराची कोशिंबीर! नक्की ट्राय करा

थंडी वाढली की घरात गाजर यायला सुरुवात होते
Carrot Salad
Carrot Saladesakal

Carrot Salad : थंडी वाढली की घरात गाजर यायला सुरुवात होते आणि ओघाओघाने मग गाजराचे वेगवेगळे पदार्थ जसं की हलवा, थालीपीठ, सॅलड, पकोडे आणि कोशिंबीर.. गाजराची कोशिंबीर करायला तशी खूप सोपी आहे, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते.कितीही प्रयत्न केला तरी आजीच्या हातची ती चव काही मिळत नाही.. तुम्हालाही असं वाटत का? ट्राय करा ही पद्धत

Carrot Salad
Miss Universe 2023 : तुम्हालाही मिस युनिव्हर्स व्हायचंय? असे करा अप्लाय!

साहित्य:

१ कप गाजराचा किस (३ मध्यम गाजरं)

१ मध्यम टोमॅटो

२ लहान हिरव्या मिरच्या

२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून

२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट

१ टिस्पून लिंबाचा रस

चिमूटभर हिंग

१/२ टिस्पून जिरे

१ टिस्पून तूप

१ टिस्पून साखर, किंवा चवीनुसार

चवीनुसार मिठ

Carrot Salad
Dabbu Ratnani Photoshoot ; पानं लावून कियराचं फोटोशूट भलतंच चर्चेत

कृती:

१. गाजराचा किस एका वाडग्यात घ्या. त्यात टोमॅटो बारीक चिरून घाला.

२. मिरच्या चिरून घ्या त्यात थोडं मीठ घाला आणि खालबत्यात कुटून घ्या.

३. आता गाजराच्याा किसात शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस, कोथिंबीर, मिठ आणि साखर घालून मिक्स करून घ्या.

४. एका कढल्यात तूप गरम करून त्यात हिंग, जिर्‍याची फोडणी करा त्यात मिरचीचा भरडा घाला. आता ती गरम फोडणी लगेच कोशिंबीरीत घाला, गॅस बंद करा आणि परत एकदा गरम कढल्यातून पूर्ण कोशिंबीर छान परवून घ्या.

५. परत वाडग्यात काढून मिक्स करून घ्या, वरून चिरलेली कोथिंबीर भुरभुरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com