esakal | Dabbu Ratnani Photoshoot ; पानं लावून कियराचं फोटोशूट भलतंच चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

Dabbu Ratnani Photoshoot ; पानं लावून कियराचं फोटोशूट भलतंच चर्चेत

Dabbu Ratnani Photoshoot ; पानं लावून कियराचं फोटोशूट भलतंच चर्चेत

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सध्या कियरा ही चांगलीच चर्चेत आहे. तिच्या शेरशाहमधील अभिनयाचं कौतूक सुरु अजून आहे. गेल्या काही दिवसांपासून शेरशहा हा सर्वात पाहिला गेलेला चित्रपट आहे. ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचे कारण तिनं केलेलं एक वेगळ्या फोटोशुटनं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बु रतनानीनं हे फोटोशुट केलं आहे. कियराचा तो फोटो आता सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे. त्यामुळे त्या फोटोला तिच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळाला आहे. कियराच्या त्या फोटोंना चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

डब्बु रतनानीच्या एका कँलेडरसाठी फोटोशुट केलं आहे. पण ते फोटोशुट भलतचं बोल्ड असल्याचे दिसुन आले आहे. त्या फोटोशुटला डब्बु रतनीननं आपल्या सोशल मीडियावरुन शेयर केलं आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यानं कियराचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेयर केला आहे. त्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. जसा तो फोटो व्हायरल झाला तशी त्याची जोरदार चर्चा होताना दिसतेय. काहींनी त्या फोटोवरुन कियराला ट्रोलही केलं आहे. त्याविषयी डब्बु रतनानीनं एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.

फोटोग्राफर डब्बू रतनानीनं सांगितलं होतं की, त्या फोटोसाठी किएरा ही काही टॉपलेस झाली नव्हती. मात्र मी क्लिक अशा पद्धतीनं केलं आहे की, त्या फोटोंतून थोडा बोल्डनेस दिसावा. एका वेगळ्या अँगलनं तो फोटो घेतला आहे. त्यामुळे त्याची चर्चाही झाली आहे. वास्तविक हा फोटो जून महिन्यात व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये कियरा ही एका समुद्रकिनारी पहूडलेली दिसते आहे. ब्लॅक अँड व्हाईट टोनमुळे या फोटोला एक वेगळाच लूक आला होता. त्यामुळे त्याची चर्चाही जोरदार झाली. आणि चाहत्यांनी या फोटोवर वेगवेगळया प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत.

loading image
go to top