Children's Diet: Start Eggs Early to Stop Allergies!
esakal
Safe Way to Start Eggs: लहान मुलांना अंडी कधीपासून खायला द्यावीत, याबद्दल पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. काही जण बाळ १ ते ३ वर्षांचे झाल्यावर अंडी देण्याचा विचार करतात. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका ऑस्ट्रेलियन संशोधनाने हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला आहे. 'जामा पेडियाट्रिक्स' या नामांकित मासिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, वयाच्या पहिल्या किंवा तिसऱ्या वर्षाऐवजी सहाव्या महिन्यापासूनच बाळाच्या आहारात अंड्याचा समावेश केल्यास, त्यांना भविष्यात होणाऱ्या अंड्याच्या अॅलर्जीचे प्रमाण १२ टक्क्यांहून अधिक कमी होऊ शकते. आहाराच्या नियमात बदल करून मुलांमधील अॅलर्जी कमी करता येते, हे सिद्ध करणारा हा जगातील पहिलाच मोठा अभ्यास ठरला आहे.