
Viral Video: चॉकलेट आप्पे कधी खाल्लेत का? पाहा व्हिडीओ
Chocolate Paniyaram: आप्पे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आवडीने खाल्ले जातात. सकाळी नाश्त्यामध्ये आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी समोर दिसली की अनेकजण त्यावर तुटून पडतात. तसं पाहिलं तर हा दाक्षिणात्य पदार्थ...परंतु महाराष्ट्रातही तो तितकाच प्रसिद्ध आहे. आप्प्याचे विविध प्रकार तुम्ही खाल्ले असतील, परंतु चॉकलेट आप्पे कधी खाल्लेत का? सध्या चॉकलेट आप्प्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Chocolate Paniyaram recipe viral video on Social Media)
हेही वाचा: Video Viral: असशील 'KGF2' चा मोठा स्टार बरं मग?, यशनं मागितली माफी
व्हायरल व्हिडीओमध्ये चॉकलेट आप्पे करतानाची संपूर्ण कृती दाखवण्यासात आली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला आप्पे बनवणारा व्यक्ती एक डेरी मिल्क कॅटबरी दाखवतो. त्यानंतर आप्पे बनवण्यासाठीचे भांडे गॅसवर ठेवतो आणि त्यावर आप्पे बनवण्यासाठीचं मिश्रण त्यावर टाकतो. परंतु या आप्प्यांना अधिक खास बनवण्यासाठी त्यावर कॅटबरीचे तुकडे टाकतो. आप्पे तयार झाल्यानंतर तो एका छान प्लेटमध्ये ते काढून घेतो. त्यानंतर त्यावर चीझ टाकतो...झाले चॉकलेट आप्पे तयार
हेही वाचा: Video Viral: चिंपाझी झाला 'पुष्पाचा' फॅन, 'श्रीवल्ली'वर केला डान्स
'दवणीय अंडे' नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. व्हिडीओ कॅप्शनमध्ये 'बरं झालं शेवटी चीझ टाकलं ते' असं लिहीलं आहे. हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडल्याचं दिसत आहे. 22 तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ आत्तापर्यंत 10 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
Web Title: Chocolate Paniyaram Recipe Viral Video On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..