Christmas Donut Recipe : ख्रिसमस सेलिब्रेशन आलं म्हणजे डोनट सुद्धा आलेच.. मग आत्ताच ट्राय करा याची चविष्ट रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Christmas Donut Recipe

Christmas Donut Recipe : ख्रिसमस सेलिब्रेशन आलं म्हणजे डोनट सुद्धा आलेच.. मग आत्ताच ट्राय करा याची चविष्ट रेसिपी

Christmas Donut Recipe : सगळीकडे ख्रिसमसच प्लॅनिंग सुरू आहे. संध्याकाळी नक्की काय बनवायचं असा विचारही मनात येत असेल. ख्रिसमस ट्री तर काल रात्रीच सजवून ठेवला असेल.आता उरतं ते आज नक्की काय बनवायचं हा प्रश्न; नाही म्हणजे केक तर असेलच.. पण ते खूप कॉमन झाल आहे. काहीतरी स्पेशल आणि नवीन रेसिपी ट्राय करावीशी वाटते असेलच. पण बनवा स्पेशल डोनट.

हेही वाचा: Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

डोनट हे दिसायला खूप आकर्षक आणि बनवायलाही सोपे असतात. गरमगरम डोनट वर थोडीशी पिठीसाखर भुरभुरा आणि खा.. बहुदा स्वर्ग सुखच. शिवाय मुलांनाही आवडेल अशी रेसिपी. चला, डोनट कसे बनवायचे याची रेसिपी बघू.

हेही वाचा: Corona Mental Health :कोरोनाच्या टेन्शनला द्या सुट्टी !

साहित्य

1 कप मैदा

1/2 कप पिठीसाखर

4 टेबलस्पून दही

1-2 टेबलस्पून दूध

1/2 टीस्पून बेकिंग पावडर

1/4 टीस्पून सोडा

चिमुटभर मीठ

1 टेबलस्पून बटर

डार्क चॉकलेट

पाव कप फ्रेश क्रीम

हेही वाचा: Christmas 2022 : प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सव उत्साहात साजरा; पाहा Photos

कृती:

1. सर्वात आधी मैदा,बेकिंग सोडा, बेकिंग पावडर,साखर आणि मीठ चाळुन घ्या.

2. नंतर त्यात दही आणि लागेल तस दुध टाकून घट्ट गोळा मळून घ्या आणि मळताना त्यात बटर घाला.

3. भिजवलेला गोळा अर्धा तास झाकून ठेवा. नंतर जाड पोळी लाटून घ्या.

4. वाटीचा वापर करून डोनट कट करून घेणे.

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणाऱ्या बाजरी मेथी पुऱ्या कशा तयार करायच्या?

5. गरम तेलात मध्यम आचेवर सर्व डोनट तळून घेणे.

6. तळलेल्या डोनट वर पिठी साखर भुरभुरा.

7. जर तुम्हाला नुसत्या साखरेऐवजी चॉकलेट खाण्याची इच्छा असेल तर, डार्क चॉकलेट आणि फ्रेश क्रीम एकत्र छान मेल्ट करून घ्या. क्रीम जास्त सैल नको.

8. आता हे क्रीम डोनटवर हे क्रीम लावून त्यावर कँडी किंवा गेम्सच्या गोळ्यांनी गानिर्श करून सर्व्ह करा.