
Healthy Apple Brownie Recipe for Weight Loss: कधी कधी डाएटवर असताना अचानक गोड खायची जोरदार तल्लफ येते – विशेषतः ब्राऊनीसारख्या गोड, चविष्ट डेझर्टसाठी. आणि जर असंच काही समोर दिसलं तर कंट्रोल करायला अवघड जातं.
मात्र आता चिंता करण्याची गरज नाही, कारण सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचिवालांनी शेअर केलेली एक खास रेसिपी तुमच्या मदतीला आली आहे. त्यांनी तयार केलेली 'ॲपल ब्राऊनी' ही अशी एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे जी तुम्हाला गिल्ट-फ्री डेसर्ट एन्जॉय करण्याची परवानगी देते. पौष्टिक घटकांसह तयार झालेली ही ब्राऊनी गोड खाण्याची इच्छा तर पूर्ण करेलच, पण तुमचं डाएटही बिघडणार नाही. चला ही रेसिपी जाणून घेऊया.
१ सफरचंद (साल काढून, बिया काढून तुकडे करावे)
१ अंडं
अर्धा कप कोको पावडर
१ टीस्पून बेकिंग पावडर
१ टेबलस्पून तेल किंवा तूप
१ टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
चिमूटभर मीठ
चॉकलेट चिप्स
मेपल सिरप (हवे असल्यास गोडपणा वाढवण्यासाठी)
ओव्हन १८० अंश सेल्सियसवर प्रिहीट करा आणि ब्राऊनी पॅनमध्ये बेकिंग पेपर लावा.
सफरचंदाचे तुकडे, अंडं, कोको पावडर, मेपल सिरप (हवे असल्यास), तेल किंवा तूप आणि बेकिंग पावडर हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
तयार मिश्रण ब्राऊनी पॅनमध्ये ओता.
ते २० ते २७ मिनिटं बेक करा, किंवा ब्राऊनी नीट शिजेपर्यंत.
तयार ब्राऊनी थंड होऊ द्या आणि मग कापून सर्व्ह करा.
ही ब्राऊनी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असून, गोड खाण्याची इच्छा पूर्ण करतानाही डाएट बिघडत नाही. त्यामुळे आता मनाला गुंतवून ठेवणाऱ्या गोड cravingsना 'हेल्दी' उत्तर मिळालं आहे!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.