esakal | ख्रिस्पी आलू टिक्की चाट एकदा घरी बनवून पहाच; पुन्हा पुन्हा बनवण्याचा आणि खाण्याचा आवरणार नाही मोह
sakal

बोलून बातमी शोधा

Crispy Aloo Tikki Chaat Marathi Recipe

अनेकांना ख्रिस्पी आलू टिक्की चाट खायला खूप आवडते. आंबट-गोड-तिखट असे गरमागरम ख्रिस्पी आलू टिक्की चाटची चव खरोखरच छान आहे. ख्रिस्पी आलू टिक्कीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.

ख्रिस्पी आलू टिक्की चाट एकदा घरी बनवून पहाच; पुन्हा पुन्हा बनवण्याचा आणि खाण्याचा आवरणार नाही मोह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे चाट. चाटचे अनेक प्रकार आहेत. तर काही  ठिकाणी चाट बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहे. कुणाला आंबट-गोड (खट्टी-मीठी) चाट आवडते तर कुणाला एकदम तिखट चाट खायला आवडते. तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी ख्रिस्पी आलू टिक्की चाट बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.

Malabar Fish Gravy Recipe : घरच्या घरी बनवा तेही अगदी झटपट

अनेकांना ख्रिस्पी आलू टिक्की चाट खायला खूप आवडते. आंबट-गोड-तिखट असे गरमागरम ख्रिस्पी आलू टिक्की चाटची चव खरोखरच छान आहे. ख्रिस्पी आलू टिक्कीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. तुम्ही घरच्या घरी ही डिश झटपट बनवू शकता. घरच्या टिक्कीमध्ये तुम्हाला बाहेर सारखी चव मिळेल. जर आपण घरी चाटचा प्रोग्राम करत असाल तर यावेळी आपण मेनूमध्ये ख्रिस्पी आलू टिक्की नक्कीच बनवू शकता. काही लोक म्हणतात की बरेच प्रयत्न करूनही त्यांची ख्रिस्पी आलू टिक्की बाहेरच्यासारखी कुरकुरीत होत नाही. ख्रिस्पी आलू टिक्कीला कुरकुरेपणा येण्यासाठी तुम्ही त्यात कॉर्नफ्लोर घालू शकता. चला तर मग बाहेरच्या सारखी ख्रिस्पी आलू टिक्की सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसे बनवायचे. 

साहित्य 

4-5 उकडलेले बटाटे
अर्धा कप ब्रेड पावडर
2 चमचे कॉर्नफ्लोर किंवा रवा
एक इंच किसलेला आले
अर्धा चमचा भाजलेले जिरे पूड
अर्धा चमचा लाल तिखट
3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
एक चमचा चाट मसाला पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर
आमचूर पावडर 
चवीनुसार मीठ
तेल

कृती : सुरवातीला बटाटे उकडून घ्या. एका भांड्यात ते बटाटे सोलून स्मॅश (एकजीव) करून घ्या. त्यात अद्रक, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कॉर्नफ्लोर किंवा रवा, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, चाट मसाला पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, आमचूर पावडर, ब्रेडचा चुरा आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व एकजीव करा. तयार उकडलेल्या बटाट्याचे लहान-लहान चपटे गोळे (टिक्की) तयार करा. या गोळ्यांना 10-15 मिनिट फ्रिजमध्ये ठेवून बाहेर काढा.

त्यानंतर एका नॉन-स्टिक पॅनमध्ये छोटा चमचा तेल टाकून गरम करा. मंद आचेवर तयार केलेले टिक्की तळून घ्या. अशारितीने ख्रिस्पी आलू टिक्की तयार झाले. हे तयार टिक्की प्लेटमध्ये ठेवा. त्यावरून दही, खजूर-चिंचेची आंबट गोड चटणी, हिरवी चटणी, पापडी, लाल तिखट आणि थोडे मीठ टाकल्यावर सर्व्ह करा. ख्रिस्पी आलू टिक्कीवर जिरे पूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 

संपादन : सुस्मिता वडतिले 

loading image