Crispy Coriander Bhaji: राज्यभरात पावसाचे आगमन झालं असून हवेत गारवा भरून राहिला आहे. अशा वेळी काहीतरी झणझणीत आणि चविष्ट खावंसं वाटतं..खिडकीवर टिपटिपणारे पावसाचे थेंब आणि त्यात गरमागरम भजींचा आस्वाद अहाहा, काय भन्नाट जोडी! त्यात जर कोथिंबीर भजीसारखी झणझणीत चव आपल्या हातात असेल, तर संध्याकाळचं रुपच बदलून जातं..TCS New Rules : TCS मध्ये नवा नियम लागू; रिकाम्या कर्मचाऱ्यांसाठी 35 दिवसांची डेडलाइन.ही भजी फक्त चवदारच नाही, तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने घरीही तयार करता येते. चला तर मग, बघूया ही खास रेसिपी!.साहित्य1. धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर2. मीठ3. लाल तिखट4. हळद5. बेसन6. तांदळाचे पीठ7. तेल तळण्यासाठी (सर्व साहित्य आवडीप्रमाणे).Liver Cleanse Remedy: फक्त 2 दिवसांत लिव्हर साफ! राजस्थानी वैद्यांचा उपाय, 'या' 8 वस्तू मिळतील दुकानदाराकडे.कृती1. एका भांड्यात कोथिंबीर घेऊन त्यात मीठ, लाल तिखट, हळद घालून थोडा वेळ ठेवावे. यामुळे मिठाला पाणी सुटते.2. त्यानंतर लागेल तितके बेसन घालावे.3. दोन चमचे तांदळाचे पीठ घालावे. गरज वाटल्यास ३-४ चमचे पाणीही घालू शकता, पण जास्त पाणी टाळावे. पीठ घट्टसर भिजवावे.4. कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाल्यावर त्यातील थोडं गरम तेल भजीच्या मिश्रणात घालावे आणि सगळं नीट मिसळावे.5. नंतर गरम तेलात भजीची लहान लहान गोळे करून तळाव्यात. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.6. गरमागरम कोथिंबीर भजी किचन पेपरवर काढा, म्हणजे जास्त तेल शोषले जाईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.