
Batata Vada recipe: सकाळचा नाश्ता हा दिवसाची सुरुवात खास बनवतो आणि जर तो रुचकर आणि चमचमीत असेल तर अजूनच आनंद होतो. पावसाळ्याच्या थंड हवेत किंवा कधीही चहासोबत खायला मिळालेले गरमागरम बटाटे वडे कुणाला आवडणार नाही. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत बटाटे वड्यांचे विशेष स्थान आहे. मऊ बटाट्याच्या मसालेदार मिश्रणाने भरलेले आणि कुरकुरीत तळलेले हे वडे अगदी सहज बनवता येतात.
मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे हे आवडते पदार्थ! खमंग चटणी आणि चहासोबत याची मजा दुप्पट होते. आज आम्ही तुमच्यासाठी आणली आहे एक सोपी आणि झटपट रेसिपी, जी तुम्ही घरात अगदी कमी वेळात बनवू शकता. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहापानाला बटाटे वडे बनवून तुमच्या कुटुंबाला खुश करु शकता. चला तर मग, लगेच नोट करा ही खास रेसिपी आणि बनवा स्वादिष्ट बटाटे वडे!