esakal | ब्रेकफास्टसाठी बनवा झटपट टेस्टी दही पराठा
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकफास्टसाठी बनवा झटपट टेस्टी दही पराठा

दही पराठा ही एक जुनी आणि खूप चांगली रेसिपी आहे,

ब्रेकफास्टसाठी बनवा झटपट टेस्टी दही पराठा

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सकाळी झटपट ब्रेकफास्ट (breakfast) बनवण्यासाठी पराठा (paratha) एक उत्तम रेसिपी आहे. म्हणून बरेचजण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवतात. दही पराठा ही एक जुनी आणि खूप चांगली रेसिपी आहे, जर तुम्हाला बाकीचे पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर आता तुम्ही दही पराठा (curd paratha) नक्की ट्राय करू शकता. दही पराठे (curd paratha) कसे बनवायचे ते जाणून घेऊया. (curd paratha recipe for breakfast)

हेही वाचा: पावसाळ्याच्या दिवसात बनवा झटपट कॉर्न सूप

साहित्य

- मैदा - 4 कप

- दही - १/२ कप

- पुदीना पाने - १/२ टीस्पून

- हिरवी मिरची - २ बारीक चिरून घ्यावी

- कांदा -1 बारीक चिरून घ्या

- चवीनुसार मीठ

- हळद - १/२ टीस्पून

- तूप - 3 टेस्पून

- ओवा - १/२ टीस्पून

हेही वाचा: मेथीची भाजी, पराठे विसरा; एकदा खाऊन बघा ‘चमन मेथी मलाई’ 

कृती :

- दही पराठे बनवणे खूप सोपे आहे. हे बनवण्यासाठी सर्वप्रथम पीठात चवीनुसारओवा, हिरव्या मिरच्या, हळद आणि मीठ घाला आणि चांगले मिसळा.

- आता दही, पुदीना पाने आणि एक चमचा तूप घाला आणि चांगले एकत्र करून घ्या.

- आता गरजेनुसार पाणी घाला आणि पीठ मळून घ्या आणि 10 मिनिटे बाजूला ठेवा. त्या पिठावरून कापड वरून झाकून ठेवा.

- आता कणकेचे गोळे बनवून त्याचे पराठे बनवा.

- पराठेला तूप लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.

- तयार पराठे चटणी किंवा सॉससोबत खा.

loading image